HW News Marathi
महाराष्ट्र

रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच – राष्ट्रपती

मुंबई । रायगड किल्ल्याला भेट ही माझ्यासाठी एक प्रकारे तीर्थयात्राच असल्याचं विधान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (६ डिसेंबर) येथे केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महामहिम राष्ट्रपतींच्या सुविद्य पत्नी श्रीमती सविता कोविंद, महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार सुनील तटकरे, युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती, युवराज शहाजीराजे छत्रपती, तसेच महसूल व पोलिस विभाग तसेच इतर विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

राष्ट्रपती आपल्या भाषणात म्हणाले की, रायगड किल्ल्याला भेट देणे, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. या रायगड भेटीला आपण एक प्रकारची तीर्थयात्राच मानतो. या भेटीसाठी निमंत्रित केल्याबद्दल त्यांनी छत्रपती संभाजीराजे यांचे विशेष आभार मानले. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेले हिंदवी स्वराज्य हे सर्व जगाला प्रेरित करणारे होते. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक एकता, सांस्कृतिक गौरव व देशप्रेम वाढीच्या परंपरेची सुरुवात केल्याचा विशेष उल्लेख केला.

 

राष्ट्रपती कोविंद यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध कार्यकुशल वैशिष्ट्यांबद्दल आपल्या भाषणातून आदर व्यक्त केला. भारतातील युवा पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची ओळख होण्यासाठी ‘शिवराजविजया’ या संस्कृत भाषेतील पुस्तकाचा भारतीय इतर भाषांमधून अनुवाद व्हावा, अशी अपेक्षा यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली. ‘मराठा लाईट इन्फंट्री’ या भारतीय सैन्याच्या युनिटच्या “छत्रपती शिवाजी महाराज की जय” या युद्ध घोषणेचा त्यांनी आवर्जून उल्लेख करताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान व्यक्त केला.

 

पश्चिम घाट आणि कोकण अशा या निसर्गसंपन्न क्षेत्रात पर्यटन आणि आधुनिकीकरणास अधिक वाव असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याची संकल्पना आपण आजच्या २१ व्या शतकात साकारू शकतो, असे त्यांनी शेवटी अधोरेखित केले. राष्ट्रपती कोविंद हे ‘रोप वे’ने रायगड किल्ल्यावर आल्यानंतर त्यांनी आपल्या पत्नी व मुलीसह होळीच्या माळावरील शिवरायांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. याशिवाय त्यांनी राजसदर येथील सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे व नंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचेही दर्शन घेऊन त्यांना आदरांजली वाहिली.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बारामतीत दिवाळी सण एकत्र साजरा न करण्याचा पवार कुटुंबाचा निर्णय !

News Desk

“ट्रम्प ठिके पण माधुरी दिक्षितसोबत माझी तुलना का ?”, मुश्रीफांचा फडणवीसांना सवाल

News Desk

मुख्यमंत्र्यांच्या रायगड फार्महाऊसची रेकी करणाऱ्या ३ जणांना अटक

News Desk