HW News Marathi
महाराष्ट्र

हिंगणघाट जळीत कांड : पीडितेच्या मृत्यूनंतर राज्यभरात तणावाचे वातावरण

नागपूर | हिंगणघाट जळीत कांडातील पीडित तरुणीची प्राणज्योत मालवली. पीडित तरुणीने आज (१० फेब्रुवारी) सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी मृत्यू झाल्याची माहिती ऑरेज रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली. ऑरेज रुग्णालयातील उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. पीडितेच्या मृत्यूची माहिती मिळताच दारोडा तिच्या गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थानी सर्व दुकाने बंद करत चंद्रपूर आणि नागपूरमध्ये रस्तारोक केला. पीडित तरुणीला दारोडा गावी तिचा मृतदेह गावी घेऊन जाणारी रुग्णवाहिनी ग्रामस्थानी अडवत आरोपीच्या मृत्यूची मागणी केली.

दरम्यान, या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी औरंगाबाद-नागपूर आणि हैदराबाद-नागपूर महामार्गावर ठिय्या आंदोलन करत रास्तारोको करत संताप व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर दारोडा गावात ३०० पोलिसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. ग्रामस्थानी पोलिसांवर दगड फेक केली. तर ग्रामस्थानचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी गर्दी पांगविण्यासाठी लाठचार्ज केला. गावकऱ्यांनी घोषणाबाजी करून संपूर्ण परिसरही दणाणून सोडला आहे. गावातील सर्वच लोक रस्त्यावर उतरल्याने या महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

हिंगणघाट जळीतकांड प्रकरणाबद्दल माहिती

नेहमीप्रमाणे शिक्षिका कॉलेजमध्ये शिकवायला पीडित तरुणी हिंगणघाट शहरात सोमवारी (३ फेब्रुवारी) सकाळी नंदोरी चौकवरून जात होती. यावेळी आरोपी विक्की नगराळे तिचा तिचा पाठलाग करत होता. आरोपीने पीडितेवर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली. पीडित तरुणीवर नागपूरच्या ऑरेज रुग्णालयात उपचार सरू असून पीडित तरुणीची प्रकृती चिंताजनक असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. आरोपी हा शिक्षिका राहत असलेल्या दारोडा गावातीलच आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ईलेक्ट्रिक बसचं उदघाटन!

News Desk

महिलांसाठी लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण! – उद्धव ठाकरे

Aprna

प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारलेली नाही!; सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे स्पष्टीकरण

News Desk