HW News Marathi
महाराष्ट्र

पाण्यावर तरंगणारा दगड मालवणात सापडला

संग्रहकार उदय रोगे यांच्या संग्रहालयात दगड पाहण्यास गर्दी

मुंबई, – मालवण समुद्र किनारी पाण्यावर तरंगणारा अनोखा दगड सापडुन आला आहे. मालवणचे संग्रहकार आणि शिवमुद्रा संग्रहालय मालवणचे संचालक श्री. उदय रोगे यांना हा दगड सापडला असून रोगे यांनी तो आपल्या संग्रहालयात प्रदर्शनासाठी ठेवला आहे. सुमारे दोन किलो वजनाचा व एक फूट लांबीचा हा दगड असून पाण्यावर तरंगणारा हा दगड पाहण्यासाठी नागरिकांबरोबरच पर्यटकांचीही गर्दी होत आहे.
मालवण मेढा भागात राहणा-या उदय रोगे यांना अलीकडच्या काळात मालवण समुद्र किना-यावर फिरत असताना वाळूत रुतलेला काळा भिन्न असा गोल गुळगुळीत आकाराचा दगड आढळून आला. रोगे हे विविध वस्तूंचे संग्राहक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी विविध प्रकारच्या दगडांचाही संग्रह करण्यास सुरुवात केली आहे. आपणास वाळूत सापडलेला हा दगड आपल्या संग्रहात राहील म्हणून तो ताब्यात घेतला. दगडाला शेवाळ व माती लागल्याने तो दगड धुण्यासाठी म्हणून पाण्याच्या हौदात टाकला. मात्र दगड पाण्यावर तरंगत राहिला.
रोगे यांनी पाण्यावर तरंगणाºया या दगडाची माहिती गुगल व अन्य ठिकाणी काढण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना श्रीलंकेत रामसेतू बांधण्यासाठी जो दगड वापरण्यात आला तो दगड याच प्रकारातला असल्याची माहिती मिळाली. हि माहिती मिळवितानाच अशा प्रकारचे दगड दक्षिण भारता बरोबरच श्रीलंका आणि जपान याभागातही आढळून येतात. ज्वालामुखीच्या लाव्हेचा पाण्याशी संयोग होऊन अशा प्रकारचे दगड निर्माण होतात अशी माहितीही श्री. रोगे यांना मिळाली आहे.
श्री. रोगे हे विविध प्रकारच्या वस्तूंचे संग्राहक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी अलीकडेच मालवणात शिवमुद्रा संग्रहालय नावाचे संग्रहालय सुरु केले आहे. या संग्रहालयात विविध प्रकारच्या ४०४० शिवमुद्रा, १ लाख विविध प्रकारची बटणे, १ लाख विविध प्रकारचे स्टिकर, २२ हजार विविध प्रकारची बॉटलची बुचे, ६२५ विविध प्रकारचे माचीस बॉक्स, १५ देशांची पोस्टाची तिकिटे, ४५ देशांची नाणी, पोतुर्गीज नाणी, शिवराई, विविध विषयांवर वर्तमान पत्रांची कात्रणे, जुन्या तांब्या पितळीच्या व विविध धातूच्या वस्तूंचा समावेश आहे. श्री. रोगे यांची या संग्रहांबद्दल लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड, वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया, इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वतःच ठेवायचं झाकून, दुसऱ्याच पहायचं वाकून हे वडेट्टीवारांनी सोडून द्यावं’, नितेश राणे यांची टीका!

News Desk

लालबागच्या राजाने जनतेसाठी नेहमीच आदर्श ठेवला – मुख्यमंत्र्यांकडून मंडळाच्या ऐतिहासिक निर्णयाचे कौतुक

News Desk

राज्यमंत्री बच्चू कडू यांना पत्र लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

News Desk