HW News Marathi
महाराष्ट्र

कुत्री, मांजरं, कोंबड्यांचे प्रतिनिधीत्व आपण करत नाही; अजित पवारांनी सर्वांना खडेबोल सुनावले

मुंबई | राज्यात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. मात्र, अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानभवनाच्या बाहेर आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली होती. त्यावेळी शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे सभागृहात जात असताना नितेश राणे यांनी ‘म्याव म्याव’ आवाज काढत आदित्य ठाकरेंना चिडवले. यानंतर अधिवेशनातही या घटनेचे पडसाद उमटले. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर आज (२८ डिसेंबर) विधीमंडळात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

विधिमंडळात सदस्यांनी संसदीय राजशिष्टाचार व आचारसंहितेचे पालन करावे, यासाठी ही बैठक होती. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नितेश राणे यांच्यासह सर्वांनाच खडेबोल सुनावले आहेत. याआधीही नितेश राणेंच्या कृत्यावरुन विधासभेत चर्चा घेण्यात आली होती. त्यावेळी भाजपा नेत्यांनी देखील त्यांच्या कृत्याचा निषेध केला होता. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही विधिमंडळ आणि आवारामध्ये सदस्यांच्या वर्तणुकीबाबत आचारसंहिता असावी, अशी भूमिका घेतली. त्यानंतर आज सभासदांचे वर्तन याबाबत बैठक घेण्यात आली. यावरुनच अजित पवार यांनीही आपली भूमिका मांडली. पवार म्हणाले, “सदस्यांचे वर्तन विधिमंडळाला शोभेल असे असायला हवे. लाखो मतदार तुम्हाला निवडून देतात, तेव्हा विधिमंडळाच्या सभागृहात येण्याची संधी मिळते. त्यामुळे आपण कुत्रे, मांजरी या प्राण्यांचे प्रतिनिधित्व करत नाही. याची जाणीव आमदारांनी ठेवली पाहिजे”, असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.

पुढे पवार म्हणाले, सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी विधीमंडळातील सर्वच पक्षाच्या आमदारांनी नियमांचे पालन केले पाहिजे. विधिमंडळ सर्वोच्च असून इतक्या वर्षांच्या सभागृहाच्या प्रदीर्घ वाटचालीत विधीमंडळ सभागृहाने उच्च मूल्य प्रस्थापित केले आहेत. त्यामुळे प्रत्येक आमदाराने आदर्श आचारसंहितेचे पालन करत जबाबदारीने वागले पाहिजे. विधानसभेत आमदार निवडून आल्यानंतर तो सार्वजनिक जीवनात कसा वागतो? सभागृहात कसे वर्तन करतो? यावरुन त्याची प्रतिमा ठरते, असेही पवार म्हणाले.  

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात घेतला मोठा निर्णय

News Desk

बळीराजा आजपासून १० दिवसीय संप

News Desk

मोठी बातमी! वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्या

News Desk