HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही आजपर्यंत कधीही पवारसाहेबांना इतके चिडलेले पाहिले नव्हते !

मुंबई | लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या दृष्टीने अन्य पक्ष आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी, निकटवर्तीयांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठी गळती लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या श्रीरामपूरमधील पत्रकारपरिषदेत एका पत्रकाराच्या प्रश्नावर शरद पवार प्रचंड संतापले. “पक्षातील ज्येष्ठ नेते पक्ष सोडताहेत मात्र आता नातेवाईकही दूर जाताहेत” या पत्रकाराच्या प्रश्नावर शरद पवार प्रचंड संपतले. “नातेवाईकांचा प्रश्न इथे आला कुठून ?” असा उलट सवाल करत शरद पवारांनी थेट तेथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. याच पार्श्वभूमीवर आता शरद पवार यांच्या कन्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“आम्हीदेखील आजपर्यंत पवारसाहेबांना इतके चिडलेले कधीही पाहिलेले नव्हते. परंतु एखाद्या प्रश्नाचे उत्तर द्यायचं नाही, असे सांगितलं असताना देखील ५ वेळा तोच तोच प्रश्न विचारला गेला. त्यांना जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं नसेल तर तितका अधिकार त्यांना आहे”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. नेरूळमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या रोजगार मेळाव्यात त्या बोलत होत्या. उस्मानाबाद आणि कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेत उपस्थित न राहिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले. दरम्यान, पदमसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या पत्नी आहेत. हाच धागा पकडत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नावर शरद पवार प्रचंड संतापले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी नागपूर ‘आयआयएम’ ही योग्य परिसंस्था ठरेल! – राष्ट्रपती राम नाथ कोविंद

Aprna

२०१९ ला परळीसहीत बीडचे सर्व मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात द्या – अजित पवार

swarit

भाजपने देशात बनावट हिंदू हृदयसम्राट बनवण्याचा प्रयत्न, तो प्रयत्न फसला! – उद्धव ठाकरे

Aprna