HW News Marathi
महाराष्ट्र

आम्ही मुख्यमंत्र्यांना भावासारखे मानले, पण ते धुर्त होते!, आशिष शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका

मुंबई | “आम्ही मुख्यमंत्र्यांना भावासारखे मानले, पण ते धुर्त होते,” अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. शेलारांनी आज (२ मे) पत्रकार परिषदेत बाबरी मशिद, मुंबईमधील बॉम्ब हल्ले, राष्ट्रवादी काँग्रेस, हिंदुत्व, शिवसेना आदी मुद्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या नेत्यांना बुद्धीदोष झाला आहे असून राऊतांनी एकदा ठाण्यात उपचार घ्यावेत, असा टोला शेलारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या बाबरीच्या मुद्यावर लगावला आहे. 

आशिष शेलार म्हणाले, “बाळासाहेब कसे होते आणि काय होत, यावर टीका-टीप्पणी आम्ही करणार नाही. आमच्यासाठी बालासाहेब हे काल आणि आज वंदनीय आहेत. होय, पण, मुख्यमंत्र्यांनी स्वत: कबुल केले की ते धुर्त आहेत. आम्ही मात्र फसलो गेलो. आम्ही त्यांना भावासारखे मानले पण ते धुर्त होते हे कळायला आम्हाला उशीर झाला. म्हणून त्यांनी धुर्तपद्धतीने आमच्या बरोबर मते घेतली. आणि सरकार दुसऱ्याबरोबर स्थापन केला. हा धुर्तपणा त्यांनी कबुल केला हे बरे झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बंद पडल्यामुळे त्यांना टाईमिंग 

राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बंद पडल्यामुळे त्यांना प्रत्येक गोष्टी त्यांना टाईमिंग दिसते. राष्ट्रवादीच्या घड्याळाचे आकडे पुढे जात नसल्यामुळे प्रत्येक गोष्टीत टाईमिंग बघण्याची त्यांची सवय आहे, भाजपच्या टाईमिंगवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी टीकेल्याचा प्रश्नावर पत्रकारांना उत्तर देताना ते म्हणाले. राज ठाकरेंच्या चितावणी देणारे भाषणा पाहून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाणार आहे, हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर शेलार म्हणाले, “चितावणीची भाषाण बघाईची असतील तर मग शिवसेना पक्षप्रमुखांची बघावी लागतील, त्यांच्याही भाषणे पहावी लागतील. सर्वच पक्षांचे बघावे लागेल. यामुळे कायद्याला कायद्याचे काम करू द्या. कोण एकालाही टार्गेट करायचे काम या राज्यात कायदा व्यवस्था घडवण्यासाठी कोणी करू नये. बाकी, कायद्याचे काम कायदा करेल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साखर कारखान्यांत मोठा घोटाळा, सोमैय्यांची रोहित पवारांच्या चौकशीची मागणी..!

Ruchita Chowdhary

पुण्यात शिकणाऱ्या अफगाण विद्यार्थ्यांनी आदित्य ठाकरेंची घेतली भेट!

News Desk

मुंबईत आज १८९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, मुंबईचा आकडा १०००च्या पुढे

News Desk