HW News Marathi
महाराष्ट्र

‘वर्षा’वर आज तासभर खलबतं ! उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या बैठकीत नेमकं काय घडलं ?

मुंबई । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये तासभर झालेल्या चर्चेत महाविकास आघाडी समोर असलेल्या विविध मुद्यांवरील मतभेदांवर चर्चा झाल्याची माहिती आहे. गेल्या दोन आठवड्यात महाविकास आघाडीत निर्माण झालेल्या मतभेदांना या बैठकीत पूर्ण विराम देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. महाविकास आघाडीत आणि सरकारमध्ये समन्वय असावा या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जातेय.

याआधी शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर महाविकास आघाडीत अनेक मुद्द्यांवरून मतभेद आणि नाराजी नाट्य सुरू होते. त्यात प्रामुख्याने

काँग्रेसचा स्वबळाचा नारा त्यावर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली नाराजी

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी चर्चा न करता त्यांनी घेतलेल्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती लोकांचा विरोध असूनही कडक केलेला लॉकडाऊन

सगळ्या मुद्यांवर महाविकास आघाडीत मतभेद आणि नाराजी होती. काल याच मुद्यांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांशीही चर्चा केली होती. त्यानंतर आज संध्याकाळी शरद पवार अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला त्यांच्या वर्षा या निवासस्थानी दाखल झाले. जवळपास तासभर या दोघांमध्ये या सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा झाली. या सगळ्या मतभेदांनी नाराजीला पूर्णविराम देऊन समन्वयाने काम करण्यासंदर्भात या दोन नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणूक

पावसाळी अधिवेशनातच विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची मागणी काँग्रेसनं केलीय. तसंच विधानसभा अध्यक्ष हा काँग्रेसचाच असेल असा दावाही काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांनीही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीवरुन राज्य सरकारवर सातत्याने हल्लाबोल सुरु ठेवलाय. या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या निवडीबाबत आता फार चालढकल करु नये. महाविकास आघाडी निवडणूक जिंकेल. त्याबाबत चिंता नको, अशी चर्चाही या बैठकीत झाल्याचं पाहायला मिळालं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस आणि चंद्रकांत पाटलांच्या ‘त्या’ टीकेला संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…

News Desk

भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात, विधानसभेच्या रणनीतीवर चर्चा

News Desk

राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी ४ हजार ७३९ उमेदवारांचे अर्ज वैध

News Desk