HW News Marathi
महाराष्ट्र

महाडिक,नरके,मुश्रीफ ,मंडलीक घराण्यातल्या शिलेदारांचं गोकुळ निवडणुकीत काय झालं ?

आरती मोरे | महाराष्ट्रात बहुचर्चित राहिलेल्या गोकुळ दुधसंघाचा निकाल लागला आहे.सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी विकास आघाडीने महाडिक गटाच्या राजर्षी शाहू आघाडीवर १७-४ असा विजय मिळवला आहे.महाडिक गटाची ३० वर्षांची निर्विवाद सत्ता पाटील -मुश्रीफ गटाने मोडून काढली आहे.

या निवडणुकीत दोन्ही गटांकडुन २१-२१ उमेदवार रिंगणात होते तर ३ अपक्ष उमेदवारांनीही अर्ज भरला होता.गोकुळचा संचालक होणं याला कोल्हापूरात आगळावेगळा सन्मान आहे.यंदाच्या गोकुळ निवडणुकीत दिग्गज नेत्यांचे वारसदारसुद्धा उभे होते.त्यांच या निवडणुकीत काय झालं ते पाहूयात.

१) ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ हे १९५९ मत मिळवत गोकुळचे संचालक झाले आहेत.

२) खासदार संजय मंडलीक यांचे सुपुत्र विरेंद्र मंडलिक यांचा मात्र गोकुळच्या निवडणुकीत पराभव झाला आहे.

३) माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा शौमिका महाडिक या महाडिक गटातून १७६९ मते मिळवत गोकुळच्या संचालक झाल्या आहेत.

४) गोकूळचे ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांचे सुपुत्र चेतन नरके हे १७६२ मते घेत गोकूळचे संचालक झाले आहेत.

त्यामुळे प्रतिष्ठेच्या या निवडणुकीत मुश्रीफ,महाडिक ,नरकेंचे शिलेदार विजयी झाले तर मंडलिकांच्या सुपुत्राचा मात्र पराभव झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उज्ज्वल निकम शिवसेनेत प्रवेश करणार?

News Desk

खडसेंनी भाजप सोडल्यानंतर उदयनराजे म्हणतात राज्याची सुत्रे ताब्यात घेण्यासाठी फडणवीसांना शुभेच्छा !

News Desk

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC परीक्षांची तारीख केली जाहीर

News Desk