HW News Marathi
महाराष्ट्र

गृहराजमंत्री शंभूराज देसाई जेव्हा उदयनराजेंना मुजरा करतात तेव्हा …!

सातारा | खासदार उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलने नेहमी प्रसिद्ध असतात.राष्ट्रवादीकडून खासदार होऊनही त्यांना भाजपात प्रवेश केला आणि लोकसभेला पराभूत झाल्यानंतर ते राज्यसभेचे खासदार झाले.महाराष्ट्रात ते विरोधी पक्षात असले तरी महाविकासआघाडीच्या अनेक नेत्यांसोबत त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत.काही दिवसांपूर्वीच त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती.शिवसेनेचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि उदयनराजे यांची मैत्री राज्याला परिचित आहे.काही दिवसांपूर्वी उदयनराजेंचा आशीर्वाद घेतानाच शंभूराज देसाई यांचा व्हिडिओ चांगलाच वायरल झाला होता.आता याचं मैत्रीचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.भर रस्त्यात शंभूराज देसाईंनी उदयनमहाराजांना थेट मुजरा केला तेव्हा..

नेमकं काय घडलं ?

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई एका लग्न समारंभासाठी कोल्हापूरला जात होते, विशेष म्हणजे त्याच वेळी योगायोगाने खासदार उदयनराजे भोसले हेदेखील गोव्याच्या दिशेने निघाले होते. या महामार्गावर मध्येच शंभुराज देसाई यांच्या गाड्यांचा ताफा दिसल्यानंतर उदयनराजेंनी त्यांची गाडीही ताफ्यासोबत नेऊन उभी केली, त्यानंतर उदयनराजेंना पाहून शंभुराज देसाईंनी त्यांची गाडी थांबवली. अचानक झालेल्या भेटीत शंभुराज देसाईंनी थेट उदयनराजेंना मुजरा केलाय. विशेष म्हणजे तो क्षण काहींनी कॅमेऱ्यात बंदिस्त केलाय आणि तो आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय. उदयनराजे यांच्याबद्दल कोणी काही बोललं तर ते खपवून घेणार नाही, साताऱ्याच्या गादीचा मान ठेवलाच पाहिजे, सातारकर म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे, असंही गेल्या काही दिवसांपूर्वी शंभुराज देसाई म्हणाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उल्हासनगरमध्ये केमिकल टॅंकचा स्फोट, तीन लहान मुलं गंभीर जखमी

News Desk

प्रेयसीच्या नातेवाईकांकडून प्रियकराचा विष पाजून खून 

News Desk

केंद्रीय पथकाकडून सिरोंचा तालुक्यात पूरबाधित भागाची पाहणी

Aprna