HW News Marathi
Covid-19

राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते, तेव्हा… !

मुंबई | “राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते तेव्हा कुणीही त्यांना बोलले नाही,” असा उलट सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केला आहे. फडणवीस हे आज (२९ जून) अमरावतीतील क्वारंटाईन सेंटरची पाहणी करत आहेत.

यावेळी फडणवीसांनी पत्रकारांशी विविध मुद्यावर बोलताना म्हटले, “भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्याचे कधीच समर्थन नाही. पण राष्ट्रवादीचे नेते यावर राजकारण करत आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमच्याबाबत खालच्या दर्जाचे बोलत होते तेव्हा कुणीही त्यांना बोलले नाही.”

गोपीचंद पडळकर नेमके काय म्हणाले

‘शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे,’ अशी टीका भाजपचे नवनिर्वाचित विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, “गेल्या अनेक वर्षापासून शरद पवार हे महाराष्ट्राचे नेतृत्त्व करतात. राज्यातील बहुजनांवर अत्याचार करण्याची भूमिका त्यांची राहिलेली आहे. ही भूमिका शरद पवार हे पुढेही कायम ठेवतील, ” असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

L6 आणि L8 परवाने असलेली मद्यविक्री दुकाने सुरु करण्यास दिल्लीत परवानगी

News Desk

लॉकडाऊनच्या काळात सायबर २५८ गुन्हे दाखल, महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

News Desk

महाराष्ट्राला गरज कर्तव्यदक्ष नेतृत्वाची, भाजप नेत्यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

News Desk