HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

कोण होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री? मोदी, शहा जोडी कुणाच्या नावावर करणार शिक्कामोर्तब!

गुजरात। गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी राजीनामा दिल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह अन्य दोन नावांची गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. गुजरातच्या मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू असून आगामी निवडणुकांना सामोरे जाताना नरेंद्र मोदी आणि अमितशहा हे दोघी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडेच सर्वांचे आता लक्ष लागले आहे.

मनसुख मांडविया यांच्या नावाची चर्चा

२०२१ मध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात आरोग्यमंत्रीपदाची धुरा दिलेल्या मनसुख मांडविया यांच्या नावाची चर्चा आहे.मात्र केवळ दोनच महिन्यांत मांडविया यांच्याकडील जबाबदारी बदलतील असे चित्र सध्या तरी नाही.मांडविया यांनीही गेल्या दोन महिन्यांत आरोग्य खात्यावर पकड मिळविली आहे. मात्र आता येत्या काही काळात समजेलच की मांडवी या यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली जाते की नाही.

दुसरे नाव उपमुख्यमंत्री नितीन पटेल

हिंदुत्ववादी असलेल्या पटेल यांचे भाजपात वजन आहे. देशात जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंतच संविधान, लोकशाही जिवंत असेल असे वादग्रस्त विधान त्यांनी मागील महिन्यात केले होते. भाजपचा अजेंडा पुढे नेणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. तर हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरणार की नितीन पटेल यांच्या नावाची चर्चा यशस्वी होऊ शकते का.

मुळचे जळगावचे असलेले सीआर, चंद्रकांत पाटील यांच्या नावाचीही चर्चा

चंद्रकात पाटील हे २०१९ मध्ये लोकसभेवर तिसऱ्यांदा निवडून आलेले नेते आहेत. २०२२ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पाटील यांच्याकडे पक्षसंघटनेची जबाबदारी दिली होती.मोदी यांचे गुजरातमधील सर्वात विश्वासू खासदार अशी त्यांची दिल्लीत ओळख आहे. इतकेच नाही तर वाराणसी या मोदी यांच्या मतदारसंघावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.सध्या ते खासदारांना देण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत.पाटील हे मुळचे जळगावचे असून १९८९ पासून ते भाजपमध्ये कार्यरत आहेत. सूरत येथे स्थायिक असलेले पाटील यांनी तळातून पक्षसंघटनेत काम केले आहे. २००९ पासून ते खासदार आहेत. गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून त्यांची चर्चा सुरू आहे.

मात्र आता येणारा काळच ठरवेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे दोघेही गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कुणावर सोपवणार हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

आम्हाला पद नकोय तर जबाबदारी हवीय

मला पाच वर्षांसाठी गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पक्षाध्यक्ष जे पी नड्डा यांचंही मार्गदर्शन माझ्यासाठी अभूतपूर्व राहीलं. यापुढे मला जी जबाबदारी दिली जाईल, ती मी मनापासून निभावण्याचा प्रयत्न करीन. आम्हाला पद नकोय तर जबाबदारी हवीय. मला आतापर्यंत जी जबाबदारी मिळाली ती मी पूर्ण केली, अशा भावना रुपाणी यांनी मीडियासमोर व्यक्त केल्या आहेत.

Related posts

“आता पार अमेरिका त्याच्याबद्दल सल्ला देऊ लागली”, अजित पवारांची भीमा-कोरेगाव प्रकरणावर प्रतिक्रिया  

News Desk

काँग्रेस पक्ष बिंडोक असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले

News Desk

“सुप्रियाताई, आम्ही कोणत्याही चौकशीला तयार आहोत!”

News Desk