HW News Marathi
महाराष्ट्र

अजित पवार,धनंजय मुंडे,जयंत पाटलांसह बड्या नेत्यांना पोलिसांनी का पाठवली नोटीस?

मुंबई | राज्यातील महाविकासआघाडी सरकारमध्ये असलेल्या महत्त्वाच्या नेत्यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडे गृहखाते असतानाही ११ नेत्यांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, जलसंपदामंत्री जयंत पाटील, शिवसेना नेते सचिन आहिर या नेत्यांचा समावेश आहे. मरीन ड्राईव्ह पोलिसांची या सगळ्यांना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

२०१८ साली पोलिसांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या सगळ्यांनी मंत्रालयासमोर तत्कालीन सरकारविरोधात आंदोलन केलं होतं. या प्रकरणी मरीन ड्राईव्ह पोलीस न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. त्याची प्रत शिवडी न्यायालयातून घेऊन जाण्यासाठी मरीन ड्राईव्ह पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी कामकाजाच्या वेळी या सर्वांनी न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.

ते 11 नेते कोण?

1. अजित पवार

2. जयंत पाटील

3. धनंजय मुंडे

4. सचिन अहिर

5. अशोक धात्रक

6. सुनिल तटकरे

7. निलेश भोसले

8. अमित हिंदळेकर

9. अनिल कदम

10. किरण अरुण गावडे

11. सोहेल सुफेदार

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई-आग्रा महामार्गावर भीषण अपघात

News Desk

शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही विद्यार्थ्यांना प्रवेश, शिक्षण विभागाचा निर्णय

News Desk

एका संघर्षमय जीवनाचा अंत झाला,घरची परिस्थिती हलाखीची असतानाही बँकेची परीक्षा पास झाली, डेंग्यूने तरुणीचा जीव घेतला.:

News Desk