HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

‘वर्क फ्रॉम होम’मुळे वीज वापरात वाढ | उर्जामंत्री नितीन राऊत

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात एप्रिल आणि मे महिन्यात वर्क फ्रॉम होममुळे वीज वापरात वाढ झाली आहे. त्यामुळे जून महिन्याच्या वीज दरात वाढ दिसून येत आहे, असे मत उर्जा मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त  केले आहे. राज्यात वीज बिलावर सर्वसामान्यांपासून ते कलाकारांनी तक्रार केली  आहे. या पार्श्वभूमीवर उर्जा मंत्र्यांनी आज (३० जून) पत्रकार परिषद बोलविली होती. यात नितीन राऊत म्हणाले, “ग्राहकांना वीज बिल भरण्यासाठी तीन आठवड्याची सवलत देण्यात आली आहे. तर जे घरात राहत नव्हते. त्यांचे प्रत्यक्ष वीज मीटर रिडिंग घेतले जाईल.”

“लॉकडाऊनदरम्यान जे मार्गदर्शक तत्वानुसार मिटीर रिडिंग बंद करण्यात आले होते. त्यानंतर काही वीज बिलाबाबत गैरसमज झाला होता. या पार्श्वभूमीवर तीन आठवड्याची सवलत वीज बिल भरायला देण्यात आली आहे. ज्या ग्राहकांना तक्रारी असतील त्यांच्यासाठी उर्जामंत्र्यांचा ईमेल आयडी देण्यात आला आहे. त्यावर तक्रार करावी,  लॉकडाऊनदरम्यान अनेक नागरिकांनी वर्क फ्रॉम होम केले आहे. त्यामुळे वीजेचा वापर गेल्या वर्षापेक्षा जास्त केला आहे,” असेही उर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले.

“जून २०२० चे बील कसे योग्य आहे, हे ग्राहकांना समजवण्यासाठी तसेच ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सर्व क्षेत्रीय कार्यालयातील मुख्य अभियंता, अधिक्षक अभियंता यांना मदत कक्ष तयार करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यानुसार मदत कक्ष तयार करण्यात आले आहेत,” अशी माहिती उर्जामंत्र्यांनी दिली.

 

Related posts

“…म्हणून देवेंद्र फडणवीसांनी परत आलंच पाहिजे”, सदाभाऊ खोत यांची मागणी

News Desk

पुन्हा एकदा चंद्रशेखर रावच तेलंगणाचे मुख्यमंत्री

News Desk

एसटी महामंडळ सर्वसामांन्यांसाठी लवकरच पेट्रोल पंप सुरु करणार ..!

News Desk