मुंबई | राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत. भाजप आघाडीचे सरकार लवकरच पडेल असा दावा करत आहेत. अशातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी भाजपचे आमदार आमच्यात संपर्कात असून त्यांची नावे कळली तर राज्यात भूकंप येईल, असा स्फोट केला आहे.
भाजपाचे आमदार आमच्या संपर्कात असून त्यांची नावं कळली तर राज्यात भूकंप येईल असा गौप्यस्फोट महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या कार्यकारी अध्यक्ष आणि महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील आघाडीचे सरकार स्थिर असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे.
“खऱ्या अर्थाने त्यांचा पक्ष किती दुर्बळ झाला आहे हे दिसत आहे. त्यांचे आमदार इथून तिथे करत आहेत.त्यांच्या १०५ पैकी आमचे किती लोक तिकडे गेले आहेत आणि ते कधीही परत येतील, याबद्दल तुम्ही हमी देऊ शकत नाही. उलट १०५ पैकीच काही लोक आमच्या संपर्कात आहेत. त्यांची नावे कळली तर राज्यात भूकंप होईल,” असा दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
Maharashtra has given new formula to the country&our govt will complete its full term…BJP should keep an eye on its 105 MLAs because it includes MLAs who changed sides. They're in contact with us&can come with us any time: State Minister&Congress leader Yashomati Thakur (16.07) pic.twitter.com/4DFh1VCxIR
— ANI (@ANI) July 16, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.