HW News Marathi
महाराष्ट्र

होय, मी आणि सदाभाऊ खोत ST कर्मचाऱ्यांच्या पगारांची जबाबदारी घेतो, पण…!

मुंबई | होय, मी आणि सदाभाऊ खोत एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारांची जबाबदारी घेण्यास तयार आहोत, असं सडेतोड उत्तर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य परिवहन मंत्री अनिल परब यांना दिलं आहे. “तुम्ही आजच्या आज तुमचा राजीनामा द्या, तुम्ही निष्क्रिय आहात. तुमच्याकडून काम होत नाही. तुम्ही इथून पळ काढताय, तुम्ही राजीनामा द्या. मी लगेच पत्र देतो की, एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार काढण्याची जबाबदारी आम्ही घेतो,” असे खडे बोल पडळकरांनी सरकारला सुनावलं

पडळकर म्हणालं, ” सदाभाऊ खोत यांना आढवण्यात आले, यासंदर्भात विचरल्यावर पडळकर म्हणालं की, कालपासून हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकार भरपूर प्रयत्न करत आहेत. कर्मचाऱ्यांचं आंदोलन शांततं सुरू असता सुद्धा त्यांनी पोलीस बळाचा वापर केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. राज्यातभरातील कर्मचाऱ्यांना त्या त्या ठिकाणी एसटी आगारात थांबून ठेवली. राज्य सरकारनं सदाभाऊ खोत यांना थांबवून ठेवलं. त्याठिकाणी त्यांनी ठिय्या आंदोनल केल्यानंतर सरकारच्या लक्ष्यात आलं. सरकारचं सर्व प्रयत्न करूनही कर्मचारी मंत्रालयाच्या परिसरात पोहचल्याचं कळाल्यनंतर त्यांनी सदाभाऊ खोतांना सोडून दिलं.

“सरकारनं एसटीचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. तरी देखील एसटी कर्मचारी मंत्रालयदात दाखल झाले आहेत. यावरून सरकारनी कर्मचाऱ्यांची भावना समजून घेतली पाहिजं. आणि मानवतंच्या दृष्टीनं आजच्या आज निर्णय घेऊन कर्मचाऱ्यांना लेखी पत्र द्या”, अशी मागणी पडळकरांनी सरकारला केली आहे. आता समितीवर एसटी कर्मचाऱ्यांचा विश्वास नाही, २०१७ मध्ये समिती गठीत केली होती. परंतु त्या समितीचा अहवाल अद्याप आलेला नाही, असा आरोपही पडळकरांनी सरकारवर केलं आहे. सरकारनं कितीही आंदोनल चिरडण्याचं प्रयत्न करूनही आम्ही येथून जाणार नाही. आणि सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना निलंबन मागं घ्या, नाही तर वाईट परिणामांना सामोरं जावे लागेल, असा धमकी वजा इशारा पडळकरांनी सरकारला दिला आहे.

संबंधित व्हिडिओ

 

 

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल आणि प्रियांका गांधी पायी हाथरसला रवाना…

News Desk

भाजपचे ‘संकल्प पत्र’ प्रसिद्ध, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी प्रयत्न करणार

News Desk

क्रिकेट मधून झालेल्या वादात मध्यस्थी केली म्हणून उपमहापौरांवर गोळीबार!

News Desk