HW News Marathi
महाराष्ट्र

योगी आदित्यनाथद्वारा लोकसंख्या नियंत्रणाचा अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर

उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे नेहमीच चर्चेत असतात. लखनऊमध्ये एका कार्यक्रमात योगी यांनी नवीन नीति जाहीर केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, वाढती लोकसंख्या विकासात बाढा ठरते. लोकसंख्या नियंत्रणासाठी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहेत.योगी यांनी सांगितले की, या बाबत जागरुकतेची भूमिका खूप महत्वाची आहे.

लोकसंख्या नीतिचा संबंध प्रत्येक नागरिकाशी जोडलेला आहे. वाढती लोकसंख्या ही गरीबीचे कारण आहे. दोन मुलांमध्येही योग्य अंतर असायला हवे. जर त्यांच्यामध्ये योग्य अंतर नसेल तर त्यांचे पोषणही चांगले होत नाही. त्यावरही परिणाम होतो. गरीबी आणि वाढती लोकसंख्या या एकमेकांशी संबंधित आहेत.

 

शाळा आणि अन्य ठिकाणांवर लोकांमध्ये जागृती केली जाणार

संपूर्ण भारत देशात जनसंख्या हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. योगी यांनी सांगितले की, समाजाच्या विविध घटकांना लक्षात घेवून सरकारने लोकसंख्या निय़ंत्रण नीति लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा संबंध केवळ लोकसंख्या स्थिरीकरणाशीच नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सुख आणि समृद्धीचा रस्ता आणणे हा देखील आहे. उत्तर प्रदेशमध्ये प्रयत्नांची गरज आहे. आम्ही वाढत्या लोकसंख्येवरून लोकांना जागरुक करणार आहोत. शाळा आणि अन्य ठिकाणांवर लोकांमध्ये जागृती केली जाणार आहे.

नवीन नीती कशी असणार?

२०२१ ते २०३० च्या प्रस्तावित नीतिद्वारे कुटुंब नियोजन कार्यक्रमाद्वारे गर्भ निरोधक उपायांची सविधा वाढविली जाणार आहे. तसेच सुरक्षित गर्भपाताची यंत्रणा उभारण्यात येईल. नवजात मृत्यू दर, माता मृत्यू दर कमी करण्यासाठी; नपुंसकता, वांझपणाच्या समस्या दूर करण्यासाठी लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या नीतिद्वारे 11 ते 19 वर्षांच्या युवकांना पोषण, शिक्षण आणि आरोग्य सुविधा देण्यासोबतच वयोवृद्धांच्या देखभालीसाठी व्यापक व्य़वस्था करणेदेखील यामध्ये आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परमबीर सिंगांनी गृहमंत्र्यावर केलेल्या आरोपचा तपास आता CBI करणार

News Desk

नाशिक ‘शैक्षणिक हब’ होण्यासाठी प्रयत्न करणार!- दादाजी भुसे

Aprna

जो खुर्चीत बसतो त्याने निर्णय घ्यायचा, बॅकसीट ड्रायव्हिंग योग्य नाही

News Desk