HW News Marathi
देश / विदेश

योगीजी राजीनामा द्या, फक्त पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका !

नवी दिल्ली । उत्तर प्रदेशातील हाथरसमधील सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे, गंभीर होत जाणारी स्थिती लक्षात घेऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी SIT ची स्थापना केली. याच पार्श्वभूमीवर, SIT च्या प्राथमिक अहवालानंतर हाथरसचे एसपी, डीएसपी आणि अन्य अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या कारवाईनंतर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आता पुन्हा योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

प्रियांका गांधी म्हणतात, “कोणाच्या आदेशांमुळे पीडित मुलगी आणि तिच्या कुटूंबियांना भयानक स्थितीला सामोरे जावे लागले? यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांचे कॉल रेकॉर्ड सार्वजनिक करा. त्याचप्रमाणे, केवळ पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करुन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करू नका. काही मोहऱ्यांना निलंबित करुन काय होणार आहे? देश तुम्हाला बघत आहे. योगी आदित्यनाथ तुम्हीही राजीनामा द्या”, अशी मागणी प्रियांका गांधींनी केली.

उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या SIT च्या प्राथमिक अहवालानुसार हाथरसचे जिल्हा पोलीस प्रमुख विक्रांत वीर , पोलीस उपअधीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाईत झाली असून त्यांच्यासह हाथरस पोलीस ठाण्यातील सर्व पोलिसांची आता नार्को पॉलिग्राफ टेस्ट देखील केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, पीडित मुलीच्या कुटुंबियांचीही नार्को पॉलिग्राफ टेस्ट केली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Article370Abolished : काश्मीरच्या निर्णयावर फारुख अब्दुल्लांची सरकारवर जहरी टीका

News Desk

सीबीएसई बारावीचा आज निकाल

News Desk

निवडणूक आयोगाचा निर्णय काय?

News Desk