महिला काँग्रेसच्यावतीनेही प्रचंड घोषणाबाजी
उत्तम बाबळे
नांदेड :- पाकिस्तानातील लष्करी न्यायालयाने हेरगिरीच्या खोट्या आरोपावरुन भारतीय निष्पाप नागरिक कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकार विरुध्दच्या महाराष्ट्रातील जनतेच्या संतप्त भावना सह्यांच्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला कळविणार आहोत. परंतु पंतप्रधान नरंद्र मोदींनी ५६ इंची छातीची हिम्मत आता दाखविण्याची हिच खरी वेळ असल्याचे आव्हान राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांनी आज येथे केले.
पाकिस्तान सरकारने भारतीय माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना हेरगिरीच्या खोट्या आरोपावरुन बेकायदेशिररित्या तुरुंगात डांबून ठेवल्याच्या निषेधार्थत राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आ.अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड शहर महानगर काँग्रेस कमिटीच्यावतीने शहरातील वजिराबाद भागातील मुथा चौक येथे सह्यांच्या मोहिम आंदोलनाचा दुसरा टप्पा शनिवार, १६ एप्रिल रोजी स.९:०० वा.पासून पार पडला. त्याप्रसंगी खा.चव्हाण आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, हेरगिरी केल्याचा कुठलाही कागदोपत्री ठोस पुरावा नसतांना पाकिस्तानी सरकार कुलभूषण जाधव यांना तुरुंगात डांबते, तसेच तेथील लष्करी न्यायालय एकतर्फी खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा ठोठावते. ही घटना अतिशय गंभीर असून भारत सरकारने वेळीच ठोस कार्यवाही करण्याची गरज आहे. तसेच त्याविरुध्दच्या केवळ नांदेडच नव्हे तर मराठवाडा आणि संबंध महाराष्ट्रातील जनतेच्या भावना किती संतप्त आहेत हे दाखवून देऊ. आ.अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली सह्यांची जोरदार मोहिम राबविण्यात येत आहे. या सह्यांच्या मोहिमेतून पाकिस्तान विरुध्दच्या देशवासियांच्या संतप्त भावना आम्ही केंद्र सरकारला कळविणारच आहोत, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यानिमित्त कागदोपत्री ठोस पुरावे मांडून कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका करण्याची तात्काळ कार्यवाही करावी असे आवाहनही खा.अशोकराव चव्हाण यांनी यावेळी केेले.
आ.अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलन प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, नरेंद्र चव्हाण, सभापती बी.आर.कदम, नगरसेवक विजय येवनकर, शहर उपाध्यक्ष श्याम दरक, पप्पू कोंडेकर, लक्ष्मीकांत गोणे, सुदेशसिंह ठाकूर, विठ्ठल पावडे, संदीप सोनकांबळे, शमीम अब्दुल्ला, सलाम चावलवाला, मसूदखान, किशोर यादव, किशोर स्वामी, आनंद चव्हाण, सुभाष रायबोळे, रविंद्रसिंघ बुंगई, विजय सोंडारे, विलास धबाले, संतोष मुळे, बालाजी सूर्यवंशी, दिपक पाटील, गोपी मुदिराज, आविनाश कदम, साबेर चाऊस, भूमन्ना आकेमवाड, युवराज वाघमारे, श्याम पाटील कोकाटे, उदय देशमुख, फारूखभाई, प्रफुल्ल सावंत, सभापती सौ.ललीता बोकारे, सभापती सौ.मंगला देशमुख, सौ.सुषमा गहेरवार, सौ.सुमती व्याहाळकर, सौ.अंजली गायकवाड, सौ.झंमपलवाड, सौ.नेरलकर, सौ.पुष्पा शर्मा, सौ.यशवंतकर, सौ.जयस्वाल, पुनिता रावत, सौ.शीला नरवाडे, कैलास राठोड, डॉ.दिनेश निखाते, उमेश चव्हाण, संजय मोरे, उमेश पवळे, सतीष देशमुख तरोडेकर, धम्मपाल कदम, राजू येनम, श्रीकांत गुंजकर, दत्तू देशमुख, रमेश गोडबोले, बाळासाहेब देशमुख, सभापती सुखदेव जाधव, बाळासाहेब देशमुख बारडकर, संजय देशमुख लहानकर, साहेबराव धनगे, गंगाप्रसाद काकडे, राजू जैन आदींसह हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.