HW News Marathi
महाराष्ट्र

बंद…बंद…बंद…महाराष्ट्र बंद – 5 जूनला शेतकऱ्यांची महाराष्ट्र बंदची हाक

6 जूनला शेतकरी करणार सरकारी कार्यालये बंद

7 तारखेला आमदार, खासदारांच्या कार्यालयांंना टाळे लावणार

अहमदनगर – शेतकऱ्यांच्या विविध संघटनांची बैठक नुकतीच संपली असून येत्या 5 जूनला महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीनेही बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून 6 जूनला शेतकरी संघटनांच्या वतीने राज्यातील सर्व सरकारी कार्यालये बंद करण्यात येणार असून आमदार आणि खासदारांच्या कार्यालयांनाही टाळे ठोकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यामुळं सरकार आणि शेतकरी संघटनांमधला संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रलंबित मागण्यांसाठी शेतक-यांनी पुकारलेल्या संपाचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना थोडासा जाणवायला लागला आहे. हा संप लांबला तर नागरिकांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. पहिल्या दिवशी या संपाची झळ फारशी जाणवली नाही, मात्र दुसऱ्या दिवसापासून संपाचा परिणाम जाणवायला सुरूवात झाली आहे. त्यामुळं महानगरांमध्ये दूध आणि भाजीपाल्याचा मोठा तुटवडा निर्माण होऊ शकतो.

मुंबई, ठाण्याला फळभाज्यांचा पुरवठा करणा-या नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये गाडयांची आवक घटली आहे. दररोज 500 ट्रक भरुन फळभाज्या एपीएमसी मार्केटमध्ये येतात पण आज फक्त 180 गाडया आल्या. यात 49 ट्रक आणि 131 टेम्पो आहेत. ठाणे आणि कल्याणमध्ये भाजीपाल्याची एकही गाडी आलेली नाही. दादरमध्ये रोज 200 गाडया भरून भाजीपाला येतो पण आज फक्त 50 ते 60 गाडयांमधून भाजीपाला आला. वसई-विरारमध्ये दुधाची आवक 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. लातूर बाजार समितीतही फक्त 40 टक्के भाज्यांची आवक झाली आहे.

सोलापूरमध्ये पोलीस बंदोबस्त असून देखील पंढरपूर मार्केटमध्ये शुकशुकाट, एक ही शेतकरी भाजीपाला घेवुन आला नाही. काल संपाच्या पहिल्या दिवशी शेतक-यांनी रस्त्यावर उतरुन निषेध केला. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांना पांगविण्यासाठी येवल्यात पोलिसांना गोळीबार करावा लागला. तर औरंगाबादेत व्यापाऱ्यांनी शेतकरी नेत्याला मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलकांनी शहरांकडे जाणारा भाजीपाला रस्त्यावर फेकून दिला, तर हजारो लीटर दूध रस्त्यांवर ओतले.

विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरीही संपात सहभागी झाल्याने बाजार समित्यांचे कामकाज ठप्प झाले. रस्तोरस्ती भाजीपाल्याचे ढीग दिसत होते आणि दुधाचे पाट वाहत होते. नाशिक जिल्ह्यामध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले. शेतमालाची वाहतूक करणारी वाहने अडवून त्यातील माल रस्त्यावर फेकण्यात आल्याने पोलिसांना काही ठिकाणी लाठीमार करावा लागला. त्यामुळे निफाड, नैताळे, लासलगाव, येवला आदी गावांमध्ये तणावसदृश परिस्थिती निर्माण झाली होती.

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर नैताळे रामपूर, गाजरवाडी, सोनेवाडी, श्रीरामनगर येथील शेतकऱ्यांनी सकाळी ८ वाजता डाळिंबी, कांदे, आंबे, बटाटे रस्त्यावर फेकून सरकारविरोधात संताप व्यक्त केला. नाशिक, मुंबई व गुजरातकडे जाणारा शेतमाल पूर्णत: बंद केला आहे. या संपाला पाठिंबा म्हणून फलोत्पादन करणारे शेतकरीही या संपात सहभागी होऊ लागले आहेत. त्यामुळं संप लाबंला तर राज्यात अराजकता निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंकजा मुंडे यांना धक्का! भाजपा चे माजी आमदार राष्ट्रवादीच्या गोटात.. जिल्हा बँकेसंदर्भात राष्ट्रवादी च्या बैठकीस हजेरी..

News Desk

संजय राऊत बिथरले आहेत त्यांना मानसोपचार तज्ञाला दाखवण्याची गरज, शेलारांचा खरमरीत टोला

News Desk

हो…शरद पवारांना भेटलो…कुणालाही चिंतेचे अथवा पोटदुखीचे कारण नाही

News Desk