ठाणे : मुंबईत नारळाचे झाड कोसळून महिला मृत्युमुखी पडल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातही झाड कोसळून जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू ओढवला आहे. पाचपाखाडी भागात एक वृक्ष उन्मळून पडला यात दुचाकीवरून निघालेले उच्च न्यायालयातील वकिल किशोर पवार (वय ३८) हे गंभीर जखमी झाले होते. आज, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठाणे महापालिकेच्या सबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी स्थानिक भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी केली आहे. याप्रकरणी, नौपाडा पोलिस अधिक तपास करीत आहेत. ठाण्यातील पाचपाखंडी परिसरातील किशोर पवार यांचा उपचारांदरम्यान काल संध्याकाळी मृत्य झाल्यानंतर आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.