HW News Marathi
मुंबई

एबीव्हीपी आणि एसएफआयच्या कार्यक्रमांमध्ये मारामारी

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास अखिल भारतीय विद्यार्थी परीषद (अभाविप) आणि स्टूडंट फेडरेशन ऑफ इंडीयाच्या (एसएफआय) कार्यकर्त्यांमध्ये संघटनांचे पोस्टर लावण्यावरून मारामारी झाली. या वेळी मारामारी सोडविण्यासाठी गेलेल्या सुरक्षारक्षकाला देखील मारहाण झाली आहे. घटवास्थळी बघ्यांची गर्दी जमल्याने दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. त्यामुळे दोन्ही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रात्री उशीरा चतुश्रुंगी पोलिस ठाण्यात धाव घेतली.

या प्रकरणात एसएफआयच्या चार ते पाच विद्यार्थ्यांना बेदम मारहाण झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणात दोन्ही संघटनेचे कार्यकर्ते एकमेकांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यासाठी रात्री उशीरापर्यत पोलिस ठाण्यात जमले होते. या प्रकरणात एसएफआयच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी अभाविपचे कार्यकर्ते जमले आहे, असे अभाविपचे प्रदीप गावडे यांनी सांगितले. या प्रकरणात अधिक माहितीसाठी एसएफआयचे नसिर शेख यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. रात्री उशीरा मिळालेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्याची कारवाई झालेली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पेट्रोल झाले स्वस्त !

News Desk

रेल्वेच्या निषेधार्थ उपोषण

News Desk

अधिकारी ब्रदर्स’चे गौतम अधिकारी यांचे निधन

News Desk