HW Marathi
मुंबई

काळू नदीला पूर, 15 गावांचा संपर्क तुटला

कल्याण: ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने टिटवाळा-रुंदे गावातील काळू नदीला पूर आला असून त्यामुळे परिसरातील 15 हून अधिक गावातील दळणवळण ठप्प झाले आहे. दरम्यान, प्रशानाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दोन दिवसांपासून कल्याण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. ठाणे परिसरातला दोन दिवसांपासून पाऊस झोडपत आहे. दरम्यान, नाशिकच्या दारणा धरणातून 12 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे धरण सध्या 71 टक्के भरले त्यामुळे नदी किनारी असलेल्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. 15 जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Related posts

‘फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार’ मोठ्या नेत्याने केलं विधान !

News Desk

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी अमोल कोल्हेंची केंद्राकडे धाव

News Desk

मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे आणि कार्यकर्त्यांना लोकल प्रवास पडला महागात, कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

News Desk