HW News Marathi
मुंबई

गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबरला नाही – अजित पवारांचा गौप्यस्फोट

मुंबई – गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबर नाही, शरद पवारांचं वलय पाहून गोपीनाथ मुंडेंनी स्वतःच्या वाढदिवसाची तारखी असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी केला आहे. ‘गोपीनाथ मुंडेंना आपला मूळ वाढदिवस माहित नव्हता, अशी माहिती विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आमदार धनंजय मुंडेंनी दिली’, असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं आहे.

गोपीनाथ मुंडे पंकजा भाजपच्या चार आमदारांसोबत पक्ष सोडण्याच्या तयारीत होते असाही गौप्यस्फोट अजित पवारांनी यावेळी केला. ‘गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या विचारात होते, मात्र भाजप नेत्या सुषमा स्वराज यांनी मुंडेंचा काँग्रेसप्रवेश थांबवला’, असंही अजित पवार म्हणाले. ‘तसंच ज्यावेळी धनंजय मुंडे पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या विचारात होते तेव्हा काही घटना घडतात, मुंडेंना सोडू नका, असा सल्ला मीच धनंजय मुंडेंना दिला होता’, असंही अजित पवार बोलले म्हणाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांनाच अटक करा संभाजी ब्रिगेडची मागणी

News Desk

येत्या ४८ तासात हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा

News Desk

यंदा लहान गणेशमूर्त्यांना फायबरची प्रभावळ 

swarit