HW News Marathi
मुंबई

चोरी प्रकरणात सुनिल शेट्टीला अटक

मुंबई – विलेपार्लेमध्ये अनेक घरांमध्ये चोरी केल्याच्या आरोपाखाली सुनिल शेट्टी या सराईत चोरट्याला अटक करण्यात आली. या चोऱ्यांसाठी सुनिल शेट्टी रिक्षाचा वापर करत होता. विलेपार्ले पोलिसांनी शेट्टीसह हिमांशू अय्यप्पा शेट्टीयार आणि दिनेश यादव या त्याच्या दोन साथीदारांनाही अटक केली आहे.

ही टोळी दरोडे घालण्यासाठी रिक्षाचा उपयोग करत होते. आपली रिक्षा घेऊन ते आधी इमारतीच्या आवारात शिरत आणि काही मिनिटांत चोरी करून पसार होत असतं. यामधील काही जण इमारतीच्याबाहेर पहारा देत आणि तेवढ्या वेळात उर्वरित आरोपी चोऱ्या करीत होते. अवघ्या काही मिनिटांत ही टोळी घरफोडी करून तिथून पसार होत असे, अशी माहिती विलेपार्ले पोलीस ठाण्याचे सहआयुक्त प्रकाश गव्हाणे यांनी दिली. विलेपार्ल्यातच नव्हे, तर संपूर्ण पश्चिम उपनगरात या टोळीने हाहाकार माजवला होता.

मे महिन्यातही या भामट्यांनी विलेपार्लेमध्ये अशाच प्रकारे चोरी केली होती. दुपारच्या वेळी घरातील सगळे सिनेमा बघायला बाहेर गेले असताना ही टोळी इमारतीत शिरली आणि अवघ्या काही मिनटांत घरातील सव्वा चार लाख रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन पसार झाले.

या सराईत चोरट्यांनी आपल्यामागे कोणता पुरावाही सोडला नव्हता. शेवटी पोलिसांनी तब्बल १० हजार मोबइलची माहिती काढली. तेव्हा हळूहळू या चोरट्यांविषयीची माहिती खबऱ्यांमार्फत पोलिसांना मिळू लागली. त्यानंतर पोलिसांनी हिमांशूसह त्याच्या टोळक्याला पकडण्यास सुरुवात केली. या सगळ्या आरोपींकडून आम्ही गुन्ह्यातल्या मुद्देमालासह एकूण साडेसात लाख रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत, असे प्रकाश गव्हाणे(सहपोलीस आयुक्त, विलेपार्ले) यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मानव कल्याणासाठी साऱ्याविश्वाला बुद्ध हवा -केंद्रियराज्यमंत्री रामदासआठवले

News Desk

….तर सहकार मंत्र्यांना कृषी मंत्री करा ! कृषी मंत्री आहेत कुठे ?

News Desk

 दिव्याचा दिव्य अभिनय, तीन तास जमिनीखाली

News Desk