HW News Marathi
मुंबई

तरूणावर धारदार शस्त्राने वार करणारा गुन्हेगार अटक

मुंबई कांदिवली परीसरीत शनिवारी रात्री मन्या शिंदे नावाच्या अट्टल गुन्हेगाराने एका तरूणावर धारदार शस्त्राने वार केल्याप्रकरणी समतानगर पोलिसांनी मन्याला अटक केली आहे. आरोपी मन्या इतर गुन्ह्यातही फरारी आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

ठाकूर व्हिलेजमधील सिंग इस्टेट येथे मन्या शनिवारी रात्री 9 च्या सुमारास त्याच्या साथीदारासोबत कारच्या बोनेटवर बसून दारू पित हेत. यावेळेस जवळ असेलेला सुमित दास या तरूणांने तेथे आला आणि कार वरून खाली उतरण्यास सांगितले. यावरून दोघात वाद झाला. मन्याला ओळखणारे काही तरूण सुमितला शांत केले. तेवढ्यात मन्या ‘तुम्हाला आता दाखवतोच’ म्हणून तेथून निघाला आणि दहा मिनिटांच्या आत आपल्या साथीदारांना घेऊन पुन्हा परतला. यावेळी त्याने वाद सोडविणाऱ्या वैभव गावडे या तरूणाच्या गळ्यावर धारदार शस्त्राने 3 ते 4 वार केले. या घटनेची माहिती स्थानीकांनी तात्काळ समता पोलिसांना कळविले असता.पोलिसांनी तत्काळ घटना स्थळावर धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या गावडे याला उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केले तेथे त्याची प्रकृती खालावल्याने त्याला नायर रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी मन्याविरोधात गुन्हा दाखल अटक केली आहे. याप्रकरणी तपास पोलिस करत असून मन्यावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे…

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईचे रस्ते तातडीने दुरुस्तीसाठी साडेपाच हजार कोटींचा निधी! – मुख्यमंत्री

Aprna

श्वान पथकच्या मदतीने वडाळा रेल्वे स्थानकाची तपासणी, रेल्वे पोलिसांना सतर्कतेचा इशारा

News Desk

मित्रानेच केला मित्राच्या पत्नीवर कु-हाडीने हल्ला

News Desk