HW News Marathi
मुंबई

पुणे – सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर सहा जण जखमी

पुणे सोलापूर महामार्गावर उरूळी कांचनजवळ भीषण अपघात झाली आहे या अपघातात दोन जण मृत्यू तर सहा जण जखमी झाले आहे. जखमीना लोणी काळभोर येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पहाटे सहाच्या सुमारास अपघात झाली असून रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला पाठीमागून येणा-या टॅंकरने धडक दिली आहे. अशी माहिती मिळाली आहे.

या अपघातात अंकुश राजाभाऊ पंडीत (वय 14 ) व टँकरचालक एकनाथ विश्वनाथ बाचारे (वय 37) यांचा जागीच मृत्यू झाला. टॅकरमधील प्रवासी मेघराज नाथाराव हनवटे (वय 36), राजू विश्वनाथ पंडीत (वय 35), कांताबाई मरीबा उजगर (वय 45), इंदु राजु पंडीत (वय 33), व ट्रकचालक शैहफान दशरथ शेख (वय 23) हे जखमी झाले आहेत.ट्रकचे टायर पंक्चर झाल्याने शैहफान व त्यांचा भाऊ महेश हा रस्त्यावर उतरून पाहणी करत असताना मागून भरधाव वेगाने आलेल्या टँकरने ट्रकला धडक दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संघाच्या आदेशाने चालणारे सरकार आरक्षणविरोधीः अशोक चव्हाण

News Desk

मुंबईला पावसाने झोडपले

News Desk

भाजपकडून जाहिरातबाजीवर 500 कोटींचा खर्च – नवाब मलिक

News Desk