नागनाथ बाबर
आरोग्य व नगरविकास विभागाचे कारवाईचे आदेश
पालघर- गेल्या 6 एप्रिलला सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान बोइसर येथील चिन्मय हॉस्पिटलच्या डॉक्टर च्या हालगर्जीपणामुळे कल्याणी कुलदीप सांबरे या २६ वर्षीय महिलेचा प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्रावाने मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्या नुसार सामाजिक कार्यकर्ते सिदार्थ सांबरे यांनी तक्रर करुन चौकशीची मागणी केली होती. तसेच महिलेच्या कुटुंबियांकडून उच्चस्तरीय चौकशी करून तिच्या मृत्युस जबाबदार असलेल्या डॉक्टरांवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती.
अन्यथा शासन व प्रशासनाने या प्रकरणाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता त्या नुसार शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव व नगर विकास विभागाने घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पालघर जिल्हाधिकारी व पालघर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
विशेष् म्हणजे चिन्मया हॉस्पिटलमध्ये यापूर्वी ही अशाच प्रकारे उपचारादरम्यान महिलांचा मृत्यु झाल्याच्या घटना घडल्या असून अद्याप ही या हॉस्पिटल वर संबंधित खात्याकड़ून कोणतीही कारवाई झाली नव्हती.
विक्रमगड़ तालुक्यातील देहर्जे येथील कल्याणी कुलदीप सांबरे या २६ वर्षीय महिलेचा प्रसुतीनंतर अतिरक्तस्त्रावाने मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती . मृत महिलेचा 3 वर्षापुर्वी विवाह झाला होता.
गर्भवती महिला कल्याणीला प्रसूती वेदना होवू लागल्याने तिला 4 एप्रिल रोजी बोईसर येथील चिन्मय हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतरदुस-या दिवशी म्हणजेच 5 एप्रिल रोजी सायंकाळी 4:30 वा.च्या सुमारास चिन्मय हॉस्पिटल मध्ये कल्याणीची प्रसूती झाली. नॉर्मलप्रसूती होत नसल्या कारणाने कल्याणीचे प्रसूतीसाठी सिझर (शस्त्रक्रिया करुन प्रसूती) करण्यात आले. परंतु सिझर झाल्यानंतर 1 ते 2 तासामध्येच अंथरूणाखाली टाकलेली पूर्णत: चादरच रक्तलाळ झाली असल्याने तिला अतिरक्तस्राव होवू लागला असल्याचे कुटुंबियांचे लक्षात आले. यावेळी कल्याणीला भुल दिले असल्याने ती बेशुद्ध अवस्थेत असल्याने तिला काहीही एक कळत नव्हते यावेळी तिची प्रकृती गंभीर झाली. यानंतरकल्याणीला पुढील उपचारांसाठी पालघर येथील ढवळे हॉस्पिटल मध्ये काल 5 एप्रिल रोजी रात्री 10 वा.च्या सुमारास दाखल करण्यात आले. परंतुढवळे हॉस्पिटल मध्ये तिच्यावर उपचार सुरु असताना कल्याणी सांबरे या महिलेचा गुरूवारी सकाळी 9:30 वाजता उपचारा दरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला. यानंतरकल्याणीचे पोस्ट मार्टम पालघर येथील ग्रामीण रुग्णालयात केले. कल्याणीचामृत्यु हा बोईसर येथील चिन्मय हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे झाला असल्याचा आरोप कल्याणीच्या कुटुंबियांनी केला. दरम्यानयाबाबत पोलिस व हॉस्पिटलकडून हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप देखील कुटुंबियांकडून होत आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.