HW News Marathi
मुंबई

फेसबुकद्वारे ब्लॅकमेलिंग होत असल्यानं तरूणीची आत्महत्या

मुंबई – एका तरूणीचं फेसबुक अकाऊंट हॅक करून त्याद्वारे इतरांना अश्लिल मेसेज पाठवून हा प्रकार थांबवण्यासाठी तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या त्या हॅकरच्या त्रासाला कंटाळून तरूणीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. संचिता ऊर्फ नयना सुरेश वाघ (वय २१) असं या तरूणीचं नाव आहे.

संचिताचं फेसबुक अकाऊंट एका हॅकरनं हॅक केलं होतं. तिच्या अकाऊंटवरून अनेकांना हॅकर अश्लील मेसेज पाठवत होता. त्यामुळे संचिता तणावात होती. हा सर्व प्रकार थांबवण्यासाठी या हॅकरनं संचिताकडे शरीरसुखाची मागणी केली होती. त्याला संचिताचा विरोध होता. अखेरीस वैफल्यग्रस्त झाल्यानं संचितानं आत्महत्येचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

याप्रकरणी संचितानं ५ मे २०१७ रोजी चारकोप पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली होती. ती तक्रार नंतर बीकेसीच्या सायबर सेलकडे वर्ग करण्यात आली. मात्र त्या हॅकरचा काहीच सुगावा पोलिसांना लागला नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई उच्च न्यायालयाकडून बेस्ट कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचा आदेश

News Desk

लंडनच्या राजकुमाराच लग्न, मुंबईत डबेवाल्यांनी केलं सेलिब्रेशन

News Desk

लोकल अजूनही रुळांवर येईना!

News Desk