HW News Marathi
मुंबई

राज्यातील 137 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई – राज्य सरकारनं पोलिस प्रशासनातील 137 वरिष्ठ अधिकाऱ्यांची बदल्या केल्या आहेत. यामध्ये 16 विशेष महानिरीक्षक, 17 उपनिरीक्षक आणि 104 अधीक्षकांच्या समावेश आहे.

राज्य पोलीस मुख्यालयामध्ये विशेष महानिरीक्षक (व्यवस्थापकीय) पदावर असलेल्या अर्चना त्यागी यांची मुंबईच्या सहआयुक्तपदी (व्यवस्थापकीय) नियुक्ती केली आहे. सहआयुक्तपद (सीपी) हे विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या बरोबरीचे आहे, तर एसपी पद हे पोलीस उपायुक्त (डीसीपी) पदाच्या बरोबरीचे आहे.

ठाण्याचे सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांची मुंबईच्या आर्थिक गुन्हा विभागात सहआयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. तर, औरंगाबादचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची मुंबईच्या वाहतूक विभागात सहआयुक्तपदी वर्णी लावण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त प्रवीण पडवळ यांची बढती करण्यात आली असून त्यांच्याकडे मुंबईच्या (दक्षिण विभाग) अतिरिक्त पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

अमरावती ग्रामीण विभागाच्या पोलीस अधीक्षक लख्मी गौतम यांना सुद्धा बढती देण्यात आली असून त्यांच्या मुंबईच्या (पूर्व विभाग) अतिरिक्त आयुक्तपदी निवड केली आहे. मुंबईचे पोलीस उपायुक्त एस जयकुमार यांना मुंबईच्या (मध्य विभाग) अतिरिक्त आयुक्तपदी बढती देण्यात आली आहे. नवी मुंबईचे सहआयुक्त मधुकर पांडे यांची त्याच पदावर ठाणे शहर येथे बदली करण्यात आली आहे. तर, राज्य गुप्तचर विभागाचे सहआयुक्त संतोष रस्तोगी यांची नवी मुंबईच्या सहआयुक्तपदी निवड करण्यात आली आहे. मुंबईतील सीआयडी विभागाचे महासंचालक रविंद्र कदम यांची पुण्याच्या सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी सुनील रामानंद यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, 11 अधिका-यांना मुंबई विभागात पोलीस उपायुक्तपदी म्हणून निवड करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पालघरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के

News Desk

अजय देवगण घेऊन येणार भारतीय जवानांच्या गलवान खोऱ्यातील शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

swarit