HW News Marathi
मुंबई

रिपाईने केली शिवसेनेशी युती

,” ओमी कलानीच्या मनमानी कारभारामुळे सोडली भाजपची साथ ”

उल्हासनगर ;भाजप,रिपाई आणि टीम ओमी कलानी यांच्या यु डी ए आघाडीमध्ये अवघ्या दोनच दिवसांमध्ये बिघाडी झाल्यामुळे रिपाई आठवले गट या आघाडीतून बाहेर पडत शिवसेनेसोबत युती केली आहे . यु डी ए मधील टीम ओमी कलानीचे प्रमुख व त्यांचे सहकारी यांनी प्रमाणाबाहेर हस्तक्षेप करून रिपाईच्या जागांवर दावा केल्याने त्यांनी यु डी ए ची साथ सोडून शिवसेनेशी युती केली आहे . काल रात्री जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व रिपाईच्या स्थानिक नेत्यांमध्ये या बाबत समझोता झाला , रिपाईसाठी शिवसेनेने १३ जागा जाहीर केले . यावेळी कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे म्हणाले कि आम्ही शिवशक्ती -भीमशक्ती मजबूत तर करणार आहोत परंतु त्याचबरोबर सिंधी समुदाय ,उत्तर भारतीय , मुस्लिम व इतर भाषिकांना देखील प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न करणार आहोत .तर रिपाईचे जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव म्हणाले भाजपशी आमची नैसर्गिक युती आहे त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच भाजपसोबत युती केली होती . यावेळी आम्हाला १२ जागा देण्याचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण , खासदार कपिल पाटील व जिल्हाध्यक्ष कुमार आयलानी यांनी मान्य केले होते ,मात्र या युतीमध्ये टीम ओमी कलानीचा समावेश झाल्यानंतर त्यांनी आमच्या निवडून येणाऱ्या जागांवर दावा केल्याने आम्ही यु डी ए व भाजपच्या युतीतून बाहेर पडत आहोत . शिवशक्ती -भीमशक्ती मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असून याबाबत आम्ही पक्ष प्रमुख रामदास आठवले यांना कल्पना दिली आहे . आज शिवसेना व रिपाईच्या नेत्यांनी एका पत्रकार परिषदेत या युतीची घोषणा केली .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लंडनच्या राजकुमाराच लग्न, मुंबईत डबेवाल्यांनी केलं सेलिब्रेशन

News Desk

विधि व न्याय विभाग उच्च न्यायालयात माहिती तंत्रज्ञानासंबंधी दोन पदांच्या निर्मितीस मान्यता

News Desk

निळ्या रंगाच्या कुत्र्याचे कुतूहल पोकळ

News Desk