HW News Marathi
मुंबई

मध्य, हार्बरसह ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर जम्बोब्लॉक

मुंबई। रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर आज (१५ सप्टेंबर) या तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे यादरम्यान सीएसएमटी दिशेकडे जाणाऱ्या धिम्या मार्गावर आज सकाळी १०.४८ ते दुपारी ३.५१ मेगाब्लॉक घेण्यात येईल. यादरम्यान धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. त्यामुळे ठाकुर्ली, कोपर, मुंब्रा आणि कळवा या स्थानकांवर लोकल थांबा घेणार नाही. हार्बर मार्गावरील वाशी आणि पनवेल दोन्ही दिशेकडील लोकल सकाळी ११.३० ते दुपारी ४ पर्यंत रद्द करण्यात येणार आहे. माहिम-गोरेगाव दोन्ही दिशेकडे सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत एकही लोकल धावणार नाही. तर सीएसएमटीहून पनवेल आणि बेलापूर मार्गावरील लोकल सकाळी ११.०६ ते सायंकाळी ४.०१ वाजेपर्यंत रद्द केल्या जातील. बेलापूर आणि पनवेलहून सीएसएमटी दिशेकडे सकाळी १०.०३ ते दुपारी ३.१६ वाजेपर्यंत एकही लोकल धावणार नाही.

त्याचप्रमाणे ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सकाळी १०.१२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत ठाणे ते पनवेल- बेलापूर, व सकाळी ११.१४ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलहून ठाणे दिशेकडे जाणाऱ्या लोकल रद्द केल्या आहेत. रविवारी सकाळी ९.५६ ते दुपारी ३.४८ पर्यंत सीएसएमटी ते वांद्रे आणि गोरेगाव लोकल रद्द करण्यात येतील. सकाळी १०.४५ ते दुपारी ४.०१ पर्यंत गोरेगाव आणि वांद्रे ते सीएसएमटी येथे एकही लोकल धावणार नाही. ब्लॉक काळात ठाणे ते वाशी आणि नेरूळ ट्रान्सहार्बर आणि सीएसएमटी ते वाशी मार्गावर विशेष लोकल सेवा चालविण्यात येतील.

माहिम ते गोरेगाव जम्बोब्लॉक पश्चिम रेल्वे प्रशासनाद्वारे हार्बर मार्गावरील माहिम ते गोरेगाव या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील मार्गावर रविवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. या वेळी चर्चगेट ते गोरेगाव धिम्या मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

News Desk

गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस 12 डिसेंबरला नाही – अजित पवारांचा गौप्यस्फोट

News Desk

 पाचशे वर्षापूर्वीच्या तंत्रज्ञानाद्वारे नाक रोपन

News Desk