HW News Marathi
मुंबई

मोल्टन पेंग्विन सोबत राणीच्या बागेत गटारी साजरी

मुंबई भायखळ्याच्या राणीबागेत शुक्रवारचा दिवस वेगळाच ठरला. कारण राणीच्या बागेत असलेल्या सर्वात लहानग्या मोल्ट नावाच्या पेंग्विनचा आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आला. मोल्टच्या वाढदिवशी चक्क गटारी साजरी करण्यात आली. वयाने सर्वात लहान असलेला मोल्ट पेंग्विन आज दोन वर्षांचा झाला आहे.

दक्षिण कोरीयाच्या सेऊलमधून आठ पेंग्विन मुंबईत आणण्यात आले होते. त्यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. उरलेल्या सातपैकी हे सर्वात लहान आणि खोडकर शेंडेफळ आहे.

राणीच्या बागेत पेंग्विनची देखरेख करणाऱ्या डॉ. मधुमिता काळे आणि त्यांच्या टीमनं मिस्टर मोल्टसाठी स्पेशल सेलिब्रेशनचं आयोजन केल होत. मोल्टला लाल रंगाचं खास टी शर्ट घालण्यात आला आणि त्याच्यासाठी बोंबिल आणि मांदेली या माशांपासून खास केक बनवला होता. या फ्रोझन फिश आईस केकचा मोल्टने फडशा फाडला आणि बर्थडे सोबत गटारीही साजरी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साईच्या मुलांनी हसत खेळत अभ्यास करण्याचे धडे गिरवले

swarit

मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर ठाकरे गटाचा आक्षेप

Seema Adhe

बेस्ट कर्मचाऱ्यांचे बोनससाठी बेमुदत धरणे आंदोलन

Gauri Tilekar