HW News Marathi
मुंबई

रुसलेला पाऊस आजपासून परतणार

पुणे- गेल्या दीड महिन्यांपासून राज्यातील बळीराजा चातकाप्रमाणे ज्याची प्रतीक्षा करत आहे, तो मायबाप पाऊस चोविस तासात सक्रीय होण्याचा नवा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. अरबी समुद्रात हवेचा दाब वाढला असून त्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून पावसाला सुरुवात होणार असून यातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आजपासून पावसाने हजेरी लावल्यास दुबार पेरणीचे संकट टळण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण, मुंबईत मुसळधार तरपश्चिम महाराष्ट्र, विदर्भ-मराठवाड्यात काही ठिकाणी चांगला पाऊस, नाशिक, नंदुरबार व आसपासच्या क्षेत्रात जोरदार पाऊस होईल, दरम्यान, मराठवाडा, अहमदनगर, विदर्भातील काही जिल्हे अद्याप कोरडे असून त्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसाने पाठ फिरवल्याने दोन वर्षापूर्वी पडलेल्या दुष्काळाची आठवण शेतकऱ्यांना सतावत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

युती तुटल्यास शिवसेनेला ‘दे धक्का’साठी भाजपाची रणनीती

News Desk

मिस्टर इंडिया स्पर्धेसाठी मुंबईचा  विदूर दीक्षित सज्ज

News Desk

#metrofordombivli : आता डोंबिवलीकरांची मेट्रोची मागणी

News Desk