HW News Marathi
मुंबई

सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपलाः खा.अशोक चव्हाण

मुंबई कॉग्रेस कार्यकर्ते आणि दलितमित्र माधवराव सावंत यांच्या निधनाने सच्चा काँग्रेस कार्यकर्ता हरपला, या शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी शोक व्यक्त केला आहे.

माधवराव सावंत यांच्या निधनावर दुःख व्यक्त करताना ते म्हणाले की, माधवराव सावंत आयुष्यभर काँग्रेस विचारांशी एकनिष्ठ होते. रायगड जिल्ह्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. समाजकारणासोबतच अनेक सहकारी संस्थांची उभारणी करून त्यांनी सहकार क्षेत्रात भरीव योगदान दिले. 1995 साली दलितमित्र पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. माजी केंद्रीय गृहमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह होता.

माधवराव सावंत यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सावंत कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विमानातून पडली एअर हॉस्टेस

swarit

शिवसेनेच्या विरोधामुळे सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब करण्यात आले

News Desk

व्हिसीला बडतर्फ केले मग व्हिटीला कधी- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची मागणी

News Desk