HW News Marathi
मुंबई

भांडारकर संस्थेत तोडफोड करणारे संभाजी ब्रिगेडचे ६८ जण निर्दोष

पुणे: पुण्यातील भांडारकर संस्थेतील तोडफोड प्रकरणातून संभाजी ब्रिगेडच्या ६८ कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. शुक्रवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका केली. तब्बल १३ वषार्नंतर या प्रकरणाचा निकाल लागला.

जेम्स लेन या पाश्चात्त्य लेखकाने ‘शिवाजी : अ हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बदनामीकारक लिखाण केल्याच्या समजूतीतून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून ५ जानेवारी २००४ ला भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेत तोडफोड करण्यात आली होती. तसेच जेम्स लेनला भांडारकर संस्थेतील १२ जणांनी मदत केल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केला होता. याप्रकरणी डेक्कन पोलिसात संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ७२ जणांविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. पुणे जिल्हा सत्र न्यायलयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. घरत यांनी ७२ जणांपैकी सध्या हयात असणा-या ६८ जणांना निर्दोष मुक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलिसांची दडपशाही, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

News Desk

शिर्केने उभारली अनधिकृत इमारत म्हाडाने अदा केले 19 कोटी

News Desk

कोरोनासारखाचं आणखी १ विषाणू समाजात आलाय, मुख्यमंत्री कोणत्या विषाणूबद्दल बोलले ?

News Desk