HW News Marathi
मुंबई

हायब्रीड बसच्या सामंजस्य कराराला बेस्टची मंजुरी

मुंबई – वांद्रे कुर्ला संकुलनातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण 25 हायब्रीड बसेस बेस्टला चालवण्यासाठी देणार आहे. या बसच्या देखभाल आणि उत्पन्नाबाबत एमएमआरडीए सोबत सामंजस्य करार करण्याला बेस्ट समितीत मंजुरी देण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर वांद्रे कुर्ला संकुलाचा विकास करण्याचे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण विभागाने योजिले आहे. त्याच अनुषंगाने बिकेसीला स्मार्ट सिटी करण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे. त्याच धर्तीवर अंतर्गत वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी 25 हायब्रीड बसेस एमएमआरडीए प्रशासन बेस्टला देणार आहे. त्यातील 5 बसेस येत्या 15 ऑगस्टपासून बेस्टला उपलब्ध होण्याची शक्यता बेस्ट महाव्यवस्थापक बागडे यांनी व्यक्त केली. तसेच या हायब्रीड बसच्या देखभाल व इतर खर्च एमएमआरडीए करणार असल्याचे ते म्हणाले. सध्या बिकेसीत बेस्टच्या बस धावत असल्यामुळे बेस्टला होणारा आर्थिक नुकसान देखील भरून मिळणार आहे. मात्र त्या बस कोणत्या मार्गावर चालवायच्या याबाबत अभ्यास करण्यात येणार आहे. तसेच हायब्रीड बस 5 आशा टप्याटप्याने बसच्या ताफ्यात दाखल होणार असल्याची माहिती बागडे यांनी दिली.

पूर्णतः वातानुकूलित असलेल्या हायब्रीड बसमध्ये प्रवाशांना वायफाय, मोबाईल चार्जिंग, टीव्ही, एफएम अशा अत्याधुनिक सुविधाही असणार आहेत. या बसची प्रवासी क्षमता 59 इतकी असून 31 प्रवासी बसून तर 28 प्रवासी उभे राहून प्रवास करू शकणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुण्यात आणखी एक हायप्रोफाइल सेक्स रॅकेट उघडकीस

News Desk

शौचालयासाठी कंत्राटदारांना मुदतवाढ, दोन वर्षांत दोन हजार शौचालये बांधली जाणार ?

News Desk

दिवसाढवळ्या त्याने पॅंटेची चैन खोलून दाखवली

News Desk