May 24, 2019
HW Marathi
क्राइम मुंबई

ब्रेन स्ट्रोकच्या त्रासाला कंटाळून जीएसटी अधीक्षकाची आत्महत्या

मुंबई |  जीएसटी अधीक्षक हरेंद्र कपाडिया (वय ५१) यांनी कफ परेडमधील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ३० व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली आहे. ही घटना काल (१४ मे) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली. कपाडिया यांनी आजारापणाला कंटाळून आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दहा महिन्यांपूर्वी हरेंद्र कपाडिया यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता. यानंतर त्यांच्या ब्रेन स्ट्रोकवर कोकिलाबेन रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. कपाडिया यांनी सात महिन्याच्या सुट्टीनंतर तीन महिन्यांपूर्वी ते पुन्हा कामावर रुजू झाले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊन देखील कपाडिया हे काहीसे निराश होते. आजारणाला कंटाळून कपाडिया यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी ड्यूटीवर उपस्थित लोकांचा जबाब नोंदवला असून कुटुंबीयांची चौकशी केली आहे.

 

Related posts

खड्ड्यांविरोधात तुर्भेच्या पीडब्लूडी कार्यालयात मनसेचे खळखट्याक

News Desk

चेंबूरमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन

News Desk

मुंबईसह उपनगरात दमदार पाऊस

News Desk