Site icon HW News Marathi

महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांविरोधात आज वरळी बंदची हाक

मुंबई |  महापुरुषांसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांविरोधात मुंबईतील वरळीमध्ये (Worli) बंदची हाक दिली आहे. याआधी महापुरुषांसंदर्भात अपमानास्पद वक्तव्याविरोधात पुणे बंद पुकारला होता. पुणे बंदला चालला प्रतिसाद मिळाला होता. या पार्श्वभूमीवर आज (15 डिसेंबर) वरळी बंदची हाक दिली आहे. वरळीत एक दिवसीय बंद पाळला जाणार आहे.

वरळीआज सकाळी 7 वाजल्यापासून ते साध्यकाळी 6 वाजेपर्यंत बंदची हाक दिला आहे. दरम्यान, आंबेडकरवादी आणि बहूजन महापुरुषांना मानणाऱ्या संघटन यांच्या वरळीकर जनता यांच्यावतीने बंद पुरण्यात आला आहे. यापूर्वी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. तर राज्याचे कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केली होती.

राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या केलेल्या वक्तव्याविरोधात पुण्यात बंदची हाक दिली होती. पुण्याच्या बंदात भाजपचे खासदार उदयनराजे भोसले देखील सहभागी झाले होते.

 

Exit mobile version