Site icon HW News Marathi

मालाडमध्ये सिलिंडर स्फोटामुळे भीषण आग; 50 झोपड्या जळून खाक

मुंबई | मुंबई मधील मालाड (Malad) येथील कुरार गावात एका झोपडपट्टीला भीषण आग (Fire) लागली आहे. या आगीत आतापर्यंत 50 हून अधिक झोपड्या जळून खाक झाल्याची माहिती प्रसार माध्यमातून मिळाली आहे. या दुर्घटनेत एका 14 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर अनेक लोक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. आगीची माहिती पोलीस आणि अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

दरम्यान, ही आग मालाड येथील पुर्व आंबेडकर नगर आग लागली होती. ही घटना आज सकाळी 11 वाजताच्या सुमारा सिलिंडर स्फोच होऊन आग लागल्याची  प्राथमिक माहिती मिळाली आहे. एका घरगुती गॅस सिलेंडर स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बघता बघता आगीने रौद्ररुप धारण केले.  यात 300 पेक्षा अधिक झोपड्या आहेत.

या परिसरात वन जमिनीवर प्लास्टिक आणि लोखंडी पत्र्यांच्या झोपड्या आहेत. या आगीमुळे 50 पेक्षा अधिक झोपड्यांचे नुकसान झाले. परंतु, आग विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. यापूर्वी कांदिवली येथील वन जमिनवरील वसलेल्या दामूनगर येथे डिसेंबर 2015 रोजी सिलेंडर स्फोटने भीषण आग लागली होती. या आगीत 7 व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला होता. तर 25 जण जमखी झाले होते. मुंबई पुन्हा एकदा वन जमिनीवर झालेल्या झोपड्यांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 

 

 

Exit mobile version