Site icon HW News Marathi

आदित्य ठाकरेंच्या आमदारकीला तीन वर्षे पूर्ण; वरळीकरांना लिहिले भावनिक पत्र

मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या आमदारकीला तीन वर्ष पूर्ण झाले आहेत. या निमित्ताने आदित्य ठाकरेंनी आज (21 नोव्हेंबर) त्यांच्या वरळी मतदारसंघातील (Worli Assembly constituency) नागरिकांना भावनिक पत्र लिहिले आहे. या पत्रातून आदित्य ठाकरेंनी तीन वर्षात वरळीतील विकास कामे सांगितली आहे. आदित्य ठाकरेंनी पत्रातून भाजपवर निशाणा साधला आहे.

 

आदित्य ठाकरेंचे हे पत्र ठकारे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते वरळीकरांच्या घरोघरी जाऊन पोहोचवत आहेत. “राजकीयदृष्ट्याही प्रत्येक पक्षाला देखिल वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो.  आपल्या वरळीवर त्यांचे लक्ष त्यांनी वरळीत लावलेले बेकायदेशीर बॅनर आणि त्यावर होणारा खर्च यामुळे मला खात्री पटते की वरळी हेवा वाटावा अशी प्रगती करतेय आणि त्यांना देखील वरळीत यावस वाटतये,” असा उपहासात्मक टोलाही त्यांनी शिंदे गट आणि भाजपला लगावला आहे.

 

आदित्य ठाकरेंनी पत्रात नेमके काय लिहिले

 

प्रिय वरळीकरांनो,

महाराष्ट्र विधानसभेमध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून माझी निवड होऊन ३ वर्षे झाली आहेत. या ३ वर्षात आपल्या प्रेमाने मला आशीर्वादित केले आहे. आणि मी प्रार्थना करतो की हेच प्रेम आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्या सोबत राहोत. माझ्या निवडणुकीपूर्वी मी तुम्हाला ‘वरळी A+’ चे वचन दिले होते. गेल्या ३ वर्षात वरळीला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर नेण्यासाठी आपण सर्व एक संघ म्हणून काम करत आहोत.

नवीन बस थांबे असोत, चांगले फुटपाथ, मजबूत रस्ते असोत, हिरवीगार मोकळ्या जागा असो, किंवा
सामुदायिक स्तरावर व वैयक्तिक स्तरावर लसीकरण ड्राइव्ह आणि इतर समस्येचे निराकरण असो आपण
वरळीकरांच्या सहकार्याने करत आलो आहोत.

म्हणूनच राजकीयदृष्ट्याही प्रत्येक पक्षाला देखिल वरळीत वेळ आणि पैसा खर्च करायचा असतो. • आपल्या वरळीवर त्यांचे लक्ष त्यांनी वरळीत लावलेले बेकायदेशीर बॅनर आणि त्यावर होणारा खर्च यामुळे मला खात्री पटते की वरळी हेवा वाटावा अशी प्रगती करतेय आणि त्यांना देखील वरळीत यावस वाटतयं.

यापूर्वी जूनमध्ये गलिच्छ राजकारण आणि गद्दारी करून लोक हिताचा विचार करणारे सरकार पाडलं गेल. पण ते आम्हाला निःस्वार्थपणे काम करण्यापासून आणि आपली सेवा करण्यापासून रोखू शकणार नाहीत. आम्ही तुमचा आशीर्वाद आणि प्रेमासाठी काम करतच राहू आणि हेच आम्हाला पुढे ऊर्जा देत राहील.

जय हिंद ! जय महाराष्ट्र!

आपला नम्र,
(आदित्य रश्मी उध्दव ठाकरे)

Exit mobile version