HW News Marathi
मुंबई

आशिष शेलार मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष

मुंबई | चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे महाराष्ट्र भाजपचे (BJP) नवे प्रदेशाध्यक्ष निवड झाली आहे. तर आशिष शेलार (Ashish Shelar) हे मुंबई भाजपचे नवे मुंबई अध्यक्ष यांची नियुक्ती करण्यात आल्याचे ट्वीट भाजपने आज (12 ऑगस्ट) केले आहे. नुकतेच शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. यात मंगलप्रभात लोढा यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. यानंतर मुंबई अध्यक्ष पदावरून रिक्त झाल्यानंतर आशिष शेलार आणि राम शिंदे नेत्यांचे नाव चर्चेत होते. यानंतर भाजपने आज नवीन कार्यकारिणी जाहीर केली आहे.

दरम्यान, याआधी आशिष शेलार मुंबई अध्यक्ष पद भूषविले आहे. 2019 मध्ये मंगलप्रभात लोढा यांची मुंबई अध्यक्ष पदी वर्णी लागली होती. आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीच्या तोंडावर आशिष शेलार भाजपने नियुक्ती केली आहे. महापालिकेवरील शिवसेनेच्या हातातून काढून भाजपचा झेंडा फकवण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे म्हटले जाते.

चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्ष तर आशिष शेलार यांच्या मुंबई अध्यक्ष नियुक्तीचे पत्र काढले आहे. राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांच्या सहीचे पत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे हे दोघेही नागपूरचे आहेत. ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंना 2019 विधानसभा निवडणुकीत तिकीट नाकारले होते. परंतु, चंद्रशेखर बावनकुळेंना विधानपरिषदेतून आमदारकी दिली. यानंतर आता प्रदेशाध्यक्ष पद दिले.

संबंधित बातम्या

चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष

 

Related posts

आमदारांसाठी राखीव स्टिकरचा गैरवापर

News Desk

उबरचे मुंबईतील कार्यालय कायमस्वरूपी बंद

News Desk

दिवा रेल्वे स्थानकात प्रवाश्यांचं आंदोलन

News Desk