HW News Marathi
मुंबई

चाळीस हजार मृतदेह हताळणारा अवलिया

मुंबईः ठाण्यातील सरकारी रुग्णालयातील शवागृहात बनारसी श्यामलाल चौटुले काम करतात. त्यांचे वय 64 असून ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. निवृत्तीबद्दल त्यांच्या महापौराच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याचे कारण म्हणजे त्यांनी केलेली सेवा सर्वात वेगळी आणि थरकाप उडवणारी आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात तब्बल चाळीस हजार मृतदेहांची पाहणी केली. पोस्टमॉर्टम करण्यापूर्वी डॉक्टरांना मृतदेह दाखवणे. ते नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे काम बनारसी करत होते. चौटुले मुळचे उत्तरप्रदेशमधील आहेत. 1973 साली ते मुंबईत दाखल झाले. त्यानी ठाणे सरकारी रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून नोकरी केली.

दोन वर्षानंतर त्यांची रवानगी शवागृहात करण्यात आली. तेव्हापासून ते निवृत्त होईपर्यंत त्यांनी शवागृहात काम केले. शवागृहात काम करणे म्हणजे नरकयातना असल्याचे ते सांगतात. दररोज वेगवेगळ्या आवस्थेतेतील मृतदेहांचे दर्शन घ्यावे लागायचे. कधीकधी मृतदेह पाहून चक्कर यायची. शवविच्छेदन करण्यासाठी डॉक्टरांना मृतदेह दाखवण्याची व शवविच्छदेन करण्याची जबाबदारी पार पाडावी लागत असे. हे काम कठिण आण वेदनादायी होते. अनेकदा दारू पिल्याशिवाय मृतदेहाला हात लावण्याची हिमंत होत नव्हती. अनेक वर्षे हा क्रम सुरू होता. शेवटी दारू बंद केली. परंतु काम थांबवले नाही. निवृत्त झाल्यांनंतरही डॉक्टर कामावर येण्यास सांगतात. त्यावेळी कामावर हजर राहत असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, आपल्या कार्यकाळात चाळीस हजार मृतदेहावर शवविच्छेदन केल्याचे त्यांनी सांगितले. एकाच वेळी 34 मृतदेह आल्याची घटना सर्वात धक्कादायक असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हार्बर मार्गावर ओव्हरहेड वायरचा शॉक लागून सर्वाधिक मृत्यू

News Desk

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे सर्व्हर डाऊन

Aprna

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी स्ट्रक्चरल ऑडिटरच्या पोलीस कोठडीत १० एप्रिलपर्यंत वाढ

News Desk