HW News Marathi
मुंबई

शाश्वत विकासासाठी युवकांच्या आंतरराष्ट्रीय ज्ञान समुदायाची सुरुवात

मुंबई | शहरी ग्रामीण त्याचबरोबर आदिवासी समुदायातील स्थानिक आणि जगभरातील तरुणांना जोडुन घेण्याची आणि शाश्वत काम उभारण्याची संकल्पना डॉ प्रभा तिरमारे यांनी कल्याणच्या टीम परिवर्तनच्या युवक मंडळीसमोर मांडली आणि युवकांच्या आंतरराष्ट्रीय ज्ञान समुदायाची IKCOYNS सुरुवात झाली. या युवकांचे पहिले निवासी शिबीर नुकतेच साद फाउंडेशनच्या मदतीने बेडीसगाव वांगणी येथे पार पडले.

युवकांमध्ये असलेले ज्ञान आणि माहितीचे संवर्धन व्हावे त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांचा विकास व्हावा आणि परिवर्तनशील विकासासाठी युवकांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने टीम परिवर्तन या युवकांच्या गटाने हे शिबीर आयोजित केले. सध्याची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा युवकांनी अभ्यास करावा विचारांचे आदानप्रदान व्हावे आणि त्यांतून स्थानिक पातळीवरील सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा या हेतुने महाराष्ट्रभरातील अनेक युवक या शिबिरास उपस्थित होते.

शिबिरात एकलव्य गावं तिथे ग्रंथालय या विषयांवर तेजश्री देवडकर आणि तुषार वारंग अंघोळीची गोळी या विषयांवर सागर वाळके आणि चेतन पाटील तर टीम परिवर्तनच्या विविध मोहिमांची माहिती नामदेव येडगे आणि भुषण राजेशिर्के यांनी शिबिरार्थ्यांना दिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अंधश्रद्धा निवारण्याचे काम आणि विविध उपक्रम मा. उत्तम जोगदंड तर कायद्याने वागा लोकचळवळ आणि युवकांची सध्याच्या राजकीय वातावरणातील भुमिका राज असरोंडकर आणि राकेश गायकवाड यांनी यावेळीं युवकांसमोर मांडली. साद फाउंडेशनच्या कामांची माहिती प्रदीप कुलकर्णी आणि माधुरी पुराणिक यांनी युवकांना सांगितली. शिबिरात युवकांना सर्पमित्र दत्ता बोंबे, सुहास पवार आणि हितेश करंजगावकर यांनी सर्पांविषयी असलेले समज गैरसमज समजावुन सांगितले शिवाय यावेळीं सर्पचित्र प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते.

समाजातील विविध प्रश्न आपल्या विद्रोही गाण्याने स्वप्नील शिरसाठ आणि रोहीत जगताप यांनी युवकांसमोर मांडली. शाश्वत विकासासाठी युवकांच्या समुदायाची ही सुरुवात असुन यापुढें आम्हीं युवककेंद्रीत गट तयार करून ग्राम शहरी अध्ययन शिबीर, सामाजिक पर्यटन, सायकल बँक, शाश्वत आणि अद्ययावत माहिती केंद्रे, आरोग्य आणि क्रीडा विषयक अनेक संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सामूहिकरीत्या काम करणार आहोत असे यावेळीं शिबीर समन्वयक अविनाश पाटील यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पनवेल ग्रामीण डॉक्टर वेल्फेअरच्या वतीने केरळ पुरग्रस्तांना मदत

News Desk

प्लास्टिक बंदीवर स्थगिती देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

News Desk

फक्त तेराशे रुपयेसाठी मित्राने केला मित्राचा खून

News Desk