HW News Marathi
मुंबई

दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद

मुंबई | दहावी, बारावी झाल्यानंतर विद्यार्थ्यांसमोर मोठा प्रश्न असतो, तो म्हणजे आता पुढे कशात करीअर करायचे?
त्यांच्या मनात करिअर विषयी नेमक्या काय कल्पना असतात? करिअर या संकल्पनेतुन आपल्याला काय अभिप्रेत असते?
विद्यार्थी दशेत करिअरबाबत निर्णय घेण्याचा टप्पा साधारणपणे हाच असतो आणि योग्य निर्णय घेण्यात विद्यार्थी यशस्वी ठरल्यास त्यांची करिअरचा दिशेने वाटचाल सुरु होते. पण अनेक वेळा योग्य मार्गदर्शना अभावी विद्यार्थी त्याचे मित्र किंवा मैत्रिणी काय करणार आहेत याकडे जास्त लक्ष देतात आणि तोच मार्ग निवडतात पण पुढे गेल्यावर त्यांच्या लक्षात येतं की मी यापेक्षा अमुक एखाद्या करीअर मधे कदाचित जास्त यशस्वी झालो असतो परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते…
म्हणूनच अशा अनेक विद्यार्थ्यांना विविध ज्ञान शाखांबद्दल ( कला, विज्ञान, वाणिज्य, तत्रांतिक शाखा,स्पर्धा परीक्षा,संगणक शिक्षण) तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे या साठी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस तर्फे करीअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता.
रविवार,दिनांक २५ मार्च २०१८,झुनझुनवाला कॉलेजच्या सभागृहात पार पडला विद्यार्थीनी व पालकानी चांगली गर्दी केली होती.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला देण्यास विरोध

News Desk

शाहरुख-गौरीने केले ४ मजली कार्यालय पालिकेकडे सुपूर्द

News Desk

अमित शहा रतन टाटांच्या भेटीला

News Desk