HW News Marathi
मुंबई

दहिसरच्या ठाकूर मॉल परिसरात स्फोट

मुंबई | दहिसरच्या ठाकूर मॉल परिसरात स्फोट झाल्याची घटना आज (२० फेब्रुवारी) घडल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. काशीमीर रोड पोलिसांच्या हद्दीत ही घटना घडली आहे. स्फोटाची माहिती मिळताच बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहेत. पश्चिम दुर्तगती महामार्गाजवळ हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आली आहे.

या स्फोटाचे कारण अद्यापही अस्पष्ट झाले नाही. स्फोट झाल्यानंतर तेथील वस्तू या तपासासाठी फॉरेंसिक लॅबमध्ये पाठवण्यात आल्या आहेत.त्यामुळे दहिसर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनास्थळी एक प्लास्टीकची बाटली आणि मेटल बॉल आढळला. याबाबत पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महानगरपालिका २३ पुलांखाली उभी करणार उद्याने 

Gauri Tilekar

पेट्रोलपंपावर मध्यरात्रीपासून डेबिट आणि क्रेडिट कार्ड स्वीकारले जाणार नाही

News Desk

दूषित पाण्यामुळे नवापुर दांडी खाडीतील अनेक मासे मृत्युमुखी

News Desk