HW News Marathi
मुंबई

शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द

मुंबई | शिवस्मारकाच्या पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या स्पीड बोटचा अपघात झाला आहे. नरीमन पॉंइट पासून २.६ किलोमीटरवर हा अपघात झाला असून ही बोट महाराष्ट्र सरकारची असल्याची माहिती मिळत आहे. या बोटीत २५ जण असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्राचे मुख्यसचिव देखील या बोटीतून प्रवास करत होते. या अपघातामुळे शिवस्मारकाच्या पायाभरणीचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

ही स्पीडबोट खडकावर आदळल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच या बोटीतील सर्वजण सुखरूप आहेत. या बोटीत पाणी शिरल्याने ही बोट बुडाल्याची माहिती मिळत आहे. सध्या १ हेलिकॉप्टर आणि दोन बोटींच्या सहय्याने मदत कार्य सुरु आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यंदाही मुंबईची तुंबई होणार- पालिका

News Desk

ठाणे, पालघर जिल्ह्यांतील बुलेट ट्रेन प्रकल्प भू संपादन प्रकरणाची विभागीय आयुक्तांमार्फत चौकशी! – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Aprna

मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक गतिमान करणाऱ्या मेट्रो मार्गिकेचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण

Aprna