HW News Marathi
मुंबई

परंतु, आमचीच अस्मिता फक्त ठिगळ लावलेली ! राज ठाकरे

मराठी | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर मराठी अस्मितेचे व्यंगचित्र काढले आहे. मराठी अस्मिताच ठिगळं लागलेल्या असल्याचे राज ठाकरेंनी व्यंगचित्र रेखाटले आहे. या व्यंगचित्ररात तमिळ, बंगाली, गुजराती, पंजाबी आणि मराठी अशा पाच राज्यातील महिलांच्या माध्यमातून अस्मिता दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

या पाच महिला खूप ताठ मानाने आपली अस्मिता जपत असल्याचे व्यंगचित्रे काढले आहे, पण मराठी अस्मिता असलेल्या महिलांच्या साडीवर ‘ब्राह्मण, माळी, दलित, मातंग, मराठा, वंजारी, आगरी आणि इतर’, “परंतु आमचीच अस्मिता फक्त ठिगळं लावलेली” असे व्यंगचित्र काढले आहे. या शिर्षकातून जातीपातीच्या राजकारणावर व्यंगचित्र काढून राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

https://www.facebook.com/RajThackeray/photos/a.165383467326144.1073741826.165370377327453/306887953175694/?type=3

तसेच कालच मराठी राजभाषा दिन झाला, त्यानिमित्त मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि देशातल्या इतर भाषिक आणि प्रांतिक अस्मिता याच्यावर एक व्यंगचित्र सुचलं होतं. काल ते पूर्ण होऊ शकलं नाही, पण आज ते इथे प्रसिद्ध करतोय. नक्की पहा आणि विचार करा. मराठी अस्मिता ही जातींच्या पलीकडे जायला. हवीहीच इच्छा.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राष्ट्रध्वज पदपथावर, ‘मुंबईत तिरंगा उठावो अभियान’

News Desk

देशाला इव्हेंटची नव्हे तर रुग्णालये, व्हेंटीलेटरची गरज आहे

News Desk

मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहावर बैठक; मुंबई पालिकेची रणनिती ठरणार?

Aprna