HW Marathi
क्राइम मुंबई

दिव्यांश सिंग प्रकरणात गुन्हा दाखल

मुंबई | दिव्यांश प्रकरणात दिंडोशी पोलीस ठाण्यात दिव्यांश सिंगच्या पालकांच्या तक्रारीवरून गटार-नाल्याचे सफाई कामावर पर्यवेक्षण करणाया अधिकारी व कर्मचारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिव्यांश गोरेगाव पूर्वेतील आंबेडकर चौक येथील गटारात पडून वाहून गेल्याची घटना बुधवार (१० जुलै) रात्री उशिरा घडली होती. या घटनेनंतर महापालिका प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफ पथकाकडून मागील काही दिवसांपासून तपास सुरू आहे. आज (१५ जुलै) सहाव्या दिवशी ही पालिका प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू होती. पण अद्याप दिव्यांशचा शोध लागला नसल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

मुलगा दिव्यांश हा मयत झाल्याची वडील नामे सुरजभान धर्मदेव सिंग यांची खात्री झाल्याने त्यांचे त्यांनी गृहीत धरून आज दिंडोशी पोलिसांनी आयपीसी ३०४ (अ) अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे. दिव्यांशच्या वडिलांनी गटार-नाल्याचे सफाई कामावर पर्यवेक्षण करणाया अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य खबरदारी म्हणून उघडया गटारवजा नाल्यावर कोणत्याही प्रकारे सिमेंट षिट्स द्वारा अथवा क्राॅकीटीकरण द्वारा कव्हर न केल्याने ही घडना घडली त्यांनी तक्रारीत सांगितले आहे.

 

Related posts

सुनील शितपचा तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज

News Desk

आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सतर्क राहवे – जिल्हाधिकारी अरुण डोंगरे

News Desk

पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

News Desk