HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शीव (सायन) रेल्वे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने कल्याणला जाणाऱ्या दिशेची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर सीएसएमटी जाणारी वाहतूक धीम्या मार्गावर वळवण्यात आली आहे. नववर्षाच्या सुट्टीनंतर आज (२ जानेवारी) दुसऱ्याच दिवशी ऑफिसचा पहिलाच दिवस असल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण दिसून आले.

लोकलमध्ये बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तांत्रिक बिघाड झाल्याने रेल्वे प्रशासनाकडून तातडीने याची दखल घेण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच मध्य रेल्वेची वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र उपनगरीय गाड्यांची वाहतूक सुमारे २० मिनिटे उशिराने सुरू आहे, अशी माहिती मिळली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई, उपनगर, वसईसह पालघरमध्ये जोरदार पाऊस

News Desk

अंधेरीतील कामगार रुग्णालयाला आग

News Desk

BREAKING NEWS | मध्य रेल्वेची मुंबईकडे जाणारी सेवा विस्कळीत

News Desk