Site icon HW News Marathi

“सर्वसामान्य गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक हरपला”, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

मुंबई | “मध्यमवर्गीयांमध्ये देखील शेअर बाजाराच्या माध्यमातून गुंतवणुकीची आवड निर्माण करणाऱ्या, शेअर बाजाराचे गुंतवणूक तज्ज्ञ राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शोक व्यक्त केला आहे.” शेअर मार्केटमधील बिग बुल आणि भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळख असणाऱ्या राकेश झुनझुनवाला यांचे निधन झाले आहे. राकेश झुनझुनवाला यांनी वयाच्या 62 वर्षी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात आज (14 ऑगस्ट) सकाळी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून राकेश झुनझुनवाला यांची प्रकृती गंभीर होती. राकेश झुनझुनवाला यांचा शेअर मार्केटमध्ये मोठा दबदबा होता.

शेअर बाजार हा केवळ मोजक्या श्रीमंत लोकांसाठी नसून  सर्वसामान्यांनादेखील शेअर बाजारात नियोजनबद्ध गुंतवणूक करून श्रीमंत होता येतं हे झुनझुनवाला यांनी दाखवून दिलं. स्वतः त्यांनी सुद्धा अतिशय कमी पैशाची गुंतवणूक करून आपली या क्षेत्रातली सुरुवात केली होती, आणि गुंतवणुकीचा अभ्यास करून एक उंची गाठली.

शेअर बाजारातील गुंतवणूक म्हणजे केवळ सट्टा बाजारातली गुंतवणूक नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये या गुंतवणुकीचे मोठे योगदान असते. त्यादृष्टीने झुनझुनवाला यांनी मध्यमवर्गीय गुंतवणूकदारांना दिशा दाखविली. राकेश झुनझुनवालांनी सुचवलेल्या शेअर्सकडे आणि त्यांच्या सल्ल्याकडे सर्वसामान्य गुंतवणूकदार लक्ष ठेवून असायचे. विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात येण्यासाठी त्यांनी  अकासा एअर ही विमान सेवाही सुरु केली होती. त्यांच्या निधनाने निश्चितपणे गुंतवणूकदारांचा मार्गदर्शक हरपला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला आहे.

आठवड्याभरापूर्वी सुरू झाली ‘अकासा एअर’ एअरलाईन्स

राकेश झुनझुनवाला यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या जाण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच राकेश झुनझुनवाला यांनी ‘अकासा एअर’ या विमान कंपनीचे उद्घाटन केले होते. ‘अकासा एअर’ एअरलाईन्सने 13 ऑगस्ट रोजी मुंबई ते अहमदाबाददरम्यान पहिले उड्डाण घेतले होते. राकेश झुनझुनवाला यांनी करिअरची सुरुवात 5 हजार रुपयांपासून सुरू केले होते. आज राकेश झुनझुनवाला यांचे नेटवर्थ जवळपास 40 हजार कोटी रुपये आहे.

पंतप्रधानांनी ट्वटी करत म्हटले, “राकेश झुनझुनवाला हे अंतर्दुष्टी आणि विनोदी होते. ते आर्थिक जगतात अमूल्य असे योगदान दिले असून त्यांनी देशाच्या प्रगतीबद्दलही ते खूप उत्सुक होते. झुनझुनवाला यांचे निधनाने दु:ख झाले. झुनझुनवाला यांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना ओम शांती.”

राकेश झुनझुनवाला यांचा अल्पपरिचय

राकेश झुनझुनवाला यांचा जन्म 5 जून 1960 रोजी सामान्य कुटुंबात झाला. झुनझुनवाला यांचे वडिल हे आयकर विभाकात अधिकार होते. झुनझुनवाला हे  १९८६ साली कॉलेजमध्ये असताना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुंबई शेअर बाजारात सेन्सेक्स केवळ 150 अंकावर होता. यावेळी झुनझुनवाला यांनी फक्त पाच हजार रुपये शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केली होती. आज राकेश झुनझुनवाला यांचे नेटवर्थ जवळपास 40 हजार कोटी रुपये आहे. झुनझुनवालांनी सर्वात आधी ‘टाटा टी’संदर्भात अंदाज व्यक्त केला होता. या झुनझुनवालांचे 43 रुपयांना ‘टाटा टी’चे पाच हजाराचे शेअर्स विकत घेतले होते. यानंतर तीन महिन्यात ‘टाटा टी’च्या शेअर्सची किंमत 143 रुपयांनी वाढ झाली होती. यामुळे ‘टाटा टी’ गुंतवणूक केलेल्या रकमेत तिपटीहून अधिक पैसे शेअर्समधून मिळाले आहेत. हर्षद मेहताच्या काळात झुनझुनवालांना मोठा नफा झाला होता. परंतु, 1992 साली अघडकीस आल्यानंतर घोटाळ्यात झुनझुनवालांना मोठा फटका बसला झाल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले.

 

 

 

 

 

 

 

Exit mobile version